नवी दिल्ली – आपल्यापैकी बहुतेक लोकांना चहा (Tea) प्यायला आवडतो. असे बरेच लोक आहेत ज्यांना चहासोबत काहीतरी खायला आवडते. लोक अनेकदा चहासोबत पराठे, पुरी, पकोडे, समोसे, स्नॅक्स किंवा बिस्किटे (tea and snacks) खातात. अनेकांना चहाचं एवढं व्यसन असतं की त्यांना दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणातही चहाचा घोट प्यायला आवडतो. पण चहासोबत काहीतरी स्नॅक्स खाण्याच्या सवयीमुळे तुमचे आरोग्य (side effect on health) बिघडू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ?
आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकदा चहासोबत अशा गोष्टी खातो ज्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. चहासोबत चुकीचे पदार्थ खाल्ल्याने आपले लिव्हर खराब होऊ शकते आणि तुम्हाला आयुष्यभर ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. चांगल्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी, तुम्ही चहासोबत काही पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे.
चहा आणि फ्रेंच फ्राईज : बर्याच लोकांना चहासोबत फ्रेंच फ्राईज, बर्गर, पिझ्झा किंवा भजी खायला आवडते. पण, तुम्हाला माहित आहे का, की या पदार्थांच्या सेवनाने आपल्या लिव्हरवर खूप वाईट परिणाम होतो. हे सर्व पदार्थ फॅटने भरलेले असतात, जे पचवण्यासाठी लिव्हरला खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्यामुळे लिव्हरचे आयुष्य कमी होऊ शकते.
मीठयुक्त पदार्थांचे अतीसेवन : चहासोबत मीठयुक्त पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. चहासोबत जास्त मीठ असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरात पाणी टिकून राहण्याची समस्या निर्माण होऊ शकते. चिप्स, स्नॅक्स किंवा बिस्किटे यासारखे कॅनमधील किंवा पॅकबंद पदार्थांचे सेवन केल्याने फॅटी लिव्हर रोग आणि लठ्ठपणाची समस्या वाढू शकते.
चहा आणि ब्रेड : बहुतेक लोकांना ब्रेकफास्टमध्ये चहासोबत ब्रेड टोस्ट किंवा ब्रेड बटर खायला आवडतं. पण रोजची ही सवय आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. चहासोबत ब्रेड खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते आणि त्याचबरोबर फॅटी लिव्हर डिसीजची समस्याही उद्भवते.
हिरव्या भाज्यांचे पदार्थ चहासोबत खाणे हानिकारक : पराठे, भजी यांसारखे भाज्यांपासून बनवलेले पदार्थ सेवन करताना चहा पिणे हानिकारक आहे. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने लिव्हरला ते पचवण्यास त्रास होतो, ज्यामुळे पोटाशी संदर्भात समस्या उद्भवू शकते.
हळदीचे सेवन : हळद कधीही चहासोबत सेवन करू नये. हळदीचे गुणधर्म चहावर प्रतिक्रिया देऊ शकतात आणि पोटाला हानी पोहोचवू शकतात. या दोन्हींचे एकत्र सेवन केल्याने ॲसिडिटी व ब्लोटिंगचा त्रास होऊ शकतो.