Watery Eyes : आपले डोळे (eye care) अतिशय नाजूक आणि सेन्सेटिव्ह असतात. त्यामुळे त्यांची खास काळजी घेणे महत्वाचे ठरते. सतत मोबाईल, लॅपटॉप पाहून डोळ्यांवर ताण पडतो. त्यामुळे चश्मा लागतो तर काहीवेळा डोळ्यांतून पाणीही (watery eyes) येते. बरेच वेळा असे होते की डोळे जळजळणे, वेदना होणे असा त्रासही जाणवू लागतो.
काही लोकांच्या डोळ्यांतून विनाकारण पाणी येऊ (Watery Eyes Problem) लागते. त्यामागे काय कारण असू शकते, व डोळ्यांतून सतत पाणी येत असेल तर काय उपाय करावेत, हे जाणून घेऊया.
डोळ्यांतून पाणी का येते ?
काही कारण नसतानाही डोळ्यातून पाणी येत असेल तर त्यामागचे कारण हे बॅक्टेरिया किंवा लहान कण असू शकतात. ॲलर्जी , डोळे कोरडे पडणे, अश्रू नलिकांमध्ये अडथळा, कॉर्नियाचा विस्तार यामुळेही डोळ्यांतून पाणी येऊ शकते. असे झाल्यास, ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन वेळेवर उपचार करून घ्यावेत. जर एखाद्या सामान्य कारणाने डोळ्यातून पाणी येत असेल तर काही घरगुती उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो.
कच्चा बटाटा (Raw Potato)
डोळ्यांतून पाणी येण्याची समस्या असेल तर कच्च्या बटाट्याने आराम मिळतो. कच्च्या बटाट्याचे तुकडे करा आणि काही वेळ डोळ्यांवर ठेवा. हे दिवसातून दोन ते तीन वेळा करा. यामुळे डोळ्यातून अश्रू येण्याची समस्या कमी होऊ शकते.
त्रिफळा (Triphala)
डोळ्यांतून पाणी येण्याचा त्रास कमी करायचा असेल तर त्रिफळाही वापरू शकता. एक कप पाण्यात अख्खे धने आणि त्रिफळा टाकून ठेवा. काही वेळाने या पाण्याने डोळे धुवा. यामुळे समस्या कमी होऊ शकते.
गरम पाणी (Hot Water)
डोळ्यात जळजळ, खाज सुटणे किंवा पाणी येत असल्यास कोमट पाण्याने शेकावे, त्याने आराम मिळतो. एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात मीठ मिसळा आणि सुती कापडाने डोळ्यांना शेक द्या. यामुळे कमी वेळातच हा त्रास कमी होऊ शकतो.
बर्फ (Ice)
साध्या कारणामुळे डोळ्यांतून पाणी येत असेल तर डोळे बर्फानेही शेकू शकता. बर्फाचा एक तुकडा घ्या आणि सुती कपड्यात बांधा आणि डोळे शेका. सकाळ-संध्याकाळ डोळे शेकल्याने आराम मिळू शकतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)