Fact Check | कोरोना लसीद्वारे मानवी शरीरात ‘मायक्रो चिप’ लावण्याची अफवा, पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत…

| Updated on: Dec 11, 2020 | 2:05 PM

जितक्या वेगाने शास्त्रज्ञ लसीवर संशोधन करत आहेत, तितक्याच वेगाने या लसींबाबत लोक अफवा देखील पसरवत आहेत.

Fact Check | कोरोना लसीद्वारे मानवी शरीरात ‘मायक्रो चिप’ लावण्याची अफवा, पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत...
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गाने अवघे विश्व हैराण झाले आहे. सध्या या विषाणूला मात देणाऱ्या लस संशोधनाचे काम अनेक देशांमध्ये सुरू आहे. जितक्या वेगाने शास्त्रज्ञ लसीवर संशोधन करत आहेत, तितक्याच वेगाने या लसींबाबत लोक अफवा देखील पसरवत आहेत. कोरोना लसीद्वारे मानवी शरीरात ‘मायक्रो चिप’ (corona vaccine microchip) लावण्यात येणार आहे, अशी अफवा नुकतीच सोशल मीडियावर चर्चिली जात होती (Fact check viral post on social media about corona vaccine and microchip).

सोशल मीडियावर लोक या अफवेवर जोरदार चर्चा करत आहेत. सोशल मिडियावरील एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘कोरोना लसीच्या नावाखाली शरीरात मायक्रो चिप बसवली जाणार आहे. असे होऊ देऊ नका!’ यानंतर अनेकांनी अशाच प्रकारच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

इथून झाली अफवेला सुरुवात…

अशा प्रकारचे षड्यंत्र रचले जात आहे, असे सांगणाऱ्या मौलानाचा एक व्हिडिओ ट्विटर आणि फेसबुकवर व्हायरल केला जात आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणत आहे की, ‘ही लस बनवली जात आहे, हे औषध इंजेक्शन द्वारे देण्यात येणार आहे. या इंजेक्शनमध्ये अशी गोष्ट त्यात घालण्यात येणार आहे, ज्याने तुमचा मूड नियंत्रित केला जाईल. त्यांना जे पाहिजे तेच तुम्ही विचार कराल. आपल्याला काय पाहिजे आहे, याच विचार करण्यास आपण सक्षम राहणार नाही. ते लोक त्यात एक लहानशी चिप घालणार आहेत. अगदी लहान जी दिसणारही नाही. त्यानंतर ते जगात एक चलन सुरू करून, इतर चलने बंद करण्याचा त्यांचा डाव आहे.’(Fact check viral post on social media about corona vaccine and microchip)

हा व्हिडीओ पोस्ट करताना एका वापरकर्त्याने असे कॅप्शन लिहिले की, ‘कोरोना लसीच्या नावाखाली शरीरात चिप बसवली जाणार आहे. कोरोनाच्या लसीत एक चिप बसवण्यात येणार असल्याचे मौलवी साहेबांना आधीच कळले आहे. त्यामुळे आता मोमीन कोरोनाची लस घेणार नाहीत.’

‘इंडिया टुडे’च्या अँटी फेक न्यूज वॉर रूमला तपासादरम्यान असे आढळले की, लसीद्वारे शरीरात मायक्रो चिप लावणे ही केवळ एक अफवा आहे. परंतु, हे खरे आहे की, लसीमध्ये मायक्रो चिप लावण्याचे तंत्र सध्या अस्तित्त्वात आहे, ज्याद्वारे ही लस घेणाऱ्यांचा डेटा सांभाळून ठेवता येणार आहे.

नेमकं सत्य काय?

यूकेमधील लोकांनी कोरोना विषाणूची लस देण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच भारतात याची सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. मात्र, कोरोना लसीद्वारे लोकांच्या शरीरात मायक्रो चिप लावण्यात येणार असे कुठलेही अधिकृत वृत्त सध्या समोर आलेले नाही (Fact check viral post on social media about corona vaccine and microchip).

लसीमधील मायक्रो चिपबद्दल प्री-फील्ड सिरिंज कंपनी अपीजेक्टचे कार्यकारी अध्यक्ष जय वॉकर यांनी सीबीएन न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘आरएफआयडी चीप लसीच्या बाहेर ठेवली जाणार आहे. या चिपमध्ये लसीच्या प्रत्येक डोससाठी वेगळा अनुक्रमांक नोंदवला आहे. या चीपद्वारे रुग्णाची कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली जात नाही. ही चिप बारकोडप्रमाणे कार्य करते. सध्याच्या काळात हे तंत्र आरोग्य कर्मचार्‍यांसाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. कारण एखाद्या भागात किती लोकांना लसी दिली गेली, हे याद्वारे सहजपणे कळते.’

यावरून हे सिद्ध होते की, मायक्रो चिप ही इंजेक्शनच्या बाहेरील बाजूस असून, केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी बसवण्यात आली आहे. तर, मौलाना कोकाब यांनी कोरोना लसीद्वारे लोकांच्या शरीरात मायक्रो चिप लावण्याबद्दल केलेले वक्तव्य हे निराधार असून, केवळ अफवा आहे. याद्वारे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जात आहे.

 

(Fact check viral post on social media about corona vaccine and microchip)