नवी दिल्ली : असे मानले जाते की नी रिप्लेसमेंट सर्जरीनंतर (knee replacement surgery) म्हणजे 886402बदलण्याच्या शस्त्रक्रियेनंतर लोकांना गुडघ्याच्या समस्येपासून आराम मिळतो. पण, गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण बरं होण्यासाठी (recovery) बराच वेळ लागतो, हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. तथापि, रिकव्हरीनंतर एखादी व्यक्ती आरामदायी आणि सुलभ जीवन जगू शकते. तर रिकव्हरीदरम्यान त्या व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नी रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया साधारणतः एक किंवा दोन तास चालते आणि आणि रुग्णाला 24 तासांच्या आत डिस्चार्ज दिला जातो. पण काही प्रकरणांमध्ये रुग्णाला 72 तासांपर्यंत रुग्णालयात (hospital) राहावे लागू शकते.
पण शस्त्रक्रियेनंतर तुमची जीवनशैली कशी असावी, जेणेकरून रिकव्हरीला जास्त वेळ लागणार नाही. नी रिप्लेसमेंट सर्जरीनंतर बरं होण्यासाठी काय करावं, हे डॉक्टरांकडून जाणून घेऊया.
गुडघ्यांवर दबाव टाकू नका
नी रिप्लेसमेंट सर्जरीनंतर तुम्हाला लवकर बरं व्हायचं असेल, तर गुडघ्यांवर दबाव येईल असे काहीही करू नका. यासाठी लगेच व्यायाम करू नका, गुडघे बळजबरीने वाकवण्याचा प्रयत्न करू नका. तसेच, तुम्हाला त्रास होईल अशा हालचाली करू नका. शस्त्रक्रियेनंतर लगेचच बराच वेळ चालणे किंवा धावणे देखील रुग्णासाठी योग्य नाही.
फिजिओथेरपी घ्या
नी रिप्लेसमेंट सर्जरीनंतर फिजिओथेरपी अत्यंत महत्त्वाची असते. शस्त्रक्रियेनंतर, डॉक्टरांनी सांगितलेले व्यायाम नियमितपणे करा. लक्षात ठेवा की गुडघा बदलल्यानंतर, तुम्हाला व्यायाम तुमच्या जीवनाचा एक भाग बनवावा लागेल. तुम्हाला वैयक्तिकरित्या एखाद्या फिजिकल ट्रेनरची नियुक्ती करायची असल्यास, प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
निष्काळजीपणा करू नका
नी रिप्लेसमेंट सर्जरी केल्यानंतर, गुडघा इकडे तिकडे वाकवणे टाळावे. जर तुम्हाला गुडघा कुठेही टेकल्यासारखा वाटत असेल तर यासाठी कुशन किंवा उशांची मदत घ्या. लक्षात ठेवा, गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेनंतर लगेचच अशा प्रकारच्या गोष्टी केल्या तर तुमचा त्रास वाढू शकतो. त्याचप्रमाणे शस्त्रक्रियेनंतर काही काळ तुम्हाला काठीच्या साहाय्याने चालावे लागेल. शस्त्रक्रियेनंतर लगेचच स्वतंत्रपणे चालण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे गुडघ्यावर दाब पडेल, ज्यामुळे तुमची परिस्थिती बिघडू शकते.
रिकव्हरीच्या विविध स्केल असतात
डॉक्टर सांगतात की “रुग्णाला हे समजून घेणे आवश्यक आहे की प्रत्येक रूग्णानुसार रिकव्हरीची वेळ बदलू शकते. सामान्यतः, शस्त्रक्रियेनंतर तीन महिन्यांत रूग्ण पूर्ण बरे होतात. काही रूग्णांना काही काळ किरकोळ वेदना जाणवू शकतात. तुमची स्थिती किती गंभीर आहे, यावर तुमची रिकव्हरी किती दिवसात होईल ते अवलंबून असते. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.”