नवी दिल्ली – जगभरात मधुमेहाच्या रुग्णांमध्ये (diabetes patients) लक्षणीय वेगाने वाढ होत आहे. भारतातही या आजाराचे 77 दशलक्ष रुग्ण आहेत. चिंतेची बाब म्हणजे आता कमी वयातच (small age) लोकांना मधुमेह होत आहे. खराब जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी (bad lifestyle less exercise) यामुळे हा आजार लोकांमध्ये वेगाने वाढत आहे. लहान मुलांनाही टाइप-2 मधुमेह होताना दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, भारतात 2025 सालापर्यंत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये 20टक्के वाढ होऊ शकते.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, मधुमेहग्रस्त रुग्णांनी त्यांच्या जीवनशैलीमध्ये काही बदल केले पाहिजेत. तसेच ज्यांना मधुमेहापासून वाचायची इच्छा असेल त्या लोकांनीही हे बदल करणे आवश्यक ठरते. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला मधुमेह असेल तर स्वत:च्या मनाने कधीही औषधे घेऊ नका, असे डॉक्टरांनी सांगितले. मधुमेहग्रस्त रुग्णांनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधांचे सेवन करावे. ओव्हर- द -काउंटर गोळ्या घेतल्याने फायदा होण्याऐवजी जास्त नुकसान होऊ शकते.
चांगला व पौष्टिक आहार घ्यावा
मधुमेह असेल तर अनेक पथ्यं पाळावी लागतात. विशेषत: रस्त्यावरील पदार्थ, जंक फूड, मिठाई आणि कार्बोनेटेड ड्रिंक्स यांचे सेवन करणे टाळावे. मधुमेहग्रस्तांनी भरपूर फळं आणि भाज्या यांचा आहारात समावेश करावा. तसेच शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ नये यासाठी दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी पीत रहावे.
व्यायाम करणे टाळू नये
जर तुम्हाला फिट आणि तंदुरुस्त रहायचे असेल तर तासनतास व्यायाम करत घाम गाळायची गरज नसते. फक्त दररोज थोडा वेळ कोणता ना कोतमा व्यायाम करत शरीर ॲक्टिव्ह ठेवले पाहिजे. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी चालायला जाऊ शकता. तसेच योगासने आणि मेडिटेशनही करू शकता.
मानसिक ताण घेऊ नका
मधुमेहामुळे इतर आजारही होऊ शकतात. हे तेव्हाच होते, जेव्हा तुम्ही खूप मानसिक ताण (stress) घेता. चिंतेमुळे मधुमेहाचा धोका वाढतो आणि गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. मधुमेहामुळे लोकांना हृदयविकार आणि किडनीशी संबंधित आजार होण्याचाही धोका असतो.
धूम्रपान व मद्यपान करू नये
धूम्रपान आणि मद्यपान केल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. मधुमेह असेल तर सिगारेट बिलकूल ओढू नये. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, देशात 20 ते 70 या वयोगटातील सुमारे 9 %लोक मधुमेहग्रस्त आहेत. दरम्यान अनेक संशोधनांमधून अशी माहिती समोर आली आहे कीस खराब पाणी आणि हवेमुळेही मधुमेह होऊ शकतो. तसेच रोज पुरेशा प्रमाणात झोप घेतली नाही तरी हा आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्तीने आपली दिनचर्या व जीवनशैली चांगली राखावी, खाण्या-पिण्याकडे पुरेसे लक्ष द्यावे आणि व्यायाम करावा. ज्यामुळे या आजाराचा धोका टळू शकेल.
( डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. )