केसांत जाणवते चिपचिप ? शांपूने धुवूनही तुमचे केस तेलकट रहात असतील तर हे उपाय करून पहा

| Updated on: Apr 01, 2023 | 3:58 PM

Oily Hair : तेलकटपणामुळे केस अनेक वेळा धुत असाल तर तसं करू नका, कारण असे केल्याने तुमच्या स्काल्पवरील प्रोटेक्टिव्ह ऑईल लेअरचेही नुकसान होऊ शकते.

केसांत जाणवते चिपचिप ? शांपूने धुवूनही तुमचे केस तेलकट रहात असतील तर हे उपाय करून पहा
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली : आजकाल बहुतांश लोक तेलकट केसांमुळे (oily hair) मोठ्या प्रमाणात त्रस्त असतात. अनेकांचे केस शांपूने धुतलेल्या दिवशीच तेलकट होऊ लागतात. तेलकट केसांकडे बघितलं की कुणीतरी खूप तेल लावल्यासारखं वाटतं. ही परिस्थिती टाळण्यासाठी बहुतेक लोक आठवड्यातून अनेक वेळा केस धुण्यास (hair wash) सुरुवात करतात, जे चांगले नाही. कारण असे केल्याने केसांमधून तेल जावो किंवा न जावो पण इतर समस्या नक्कीच निर्माण होतील. तेलकट केसांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी (hair care) घ्यावी लागेल.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, तेलकट केसांपासून मुक्त होण्यासाठी, आपण प्रथम शांपूमध्ये असलेल्या घटकांकडे लक्ष दिले पाहिजे. सेलेनियम सल्फाइड आणि झिंक सारखे घटक तुमच्या स्काल्पवरील तेलाचे उत्पादन कमी करण्यास मदत करतात. एवढेच नाही तर सॅलिसिलिक ॲसिडमुळे स्काल्पवर तेल निर्माण होण्यासही प्रतिबंध होतो.

स्काल्प तेलकट का होते ?

हे सुद्धा वाचा

टाळूवर तेल निर्माण झाल्यामुळे अनेकांचे केस तेलकट होतात. तेलकट केसांची अनेक कारणे असू शकतात

1) वातावरणातील आर्द्रता

2) जास्त व्यायाम केल्यानेही तेलाच्या निर्मितीमध्ये वाढ होऊ शकते.

3) काही वेळेस स्काल्प तेलकट होण्यासाठी स्ट्रेसही कारणीभूत ठरू शकतो. कारण त्यामुळे कार्टिसोल सारख्या काही हार्मोन्सवर प्रभाव पडतो.

स्काल्प खूप तेलकट असेल तर काय करावे ?

केस धुल्यानंतर काही तासांतच जर तुमची स्काल्प खूप तेलकट किंवा खवलेयुक्त झाली असेल तर तुम्ही तेथे खाजवणे टाळावे. याशिवाय सॅलिसिलिक ॲसिडसारखे घटक असलेले शाम्पू वापरावेत. तेलकटपणामुळे केस अनेक वेळा धूत असाल तर आता तसे करू नका. कारण असे केल्याने तुमच्या स्काल्पवरील संरक्षक तेलाचा थराचे देखील नुकसान होऊ शकते.

तेलकट स्काल्प असलेल्या लोकांना आठवड्यातून तीनदा केस धुण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तेलकट स्काल्पवर कंडिशनर लावू नका. जर तुम्हाला कंडिशनर लावायचे असेल तर केसांच्या लांबीवर लावा. तेलकट केसांसाठी सॅलिसिलिक ॲसिड आणि टी ट्री ऑइल असलेला शांपू वापरा. जर शांपूमध्ये कोरफड असेल तर ती स्काल्पचा तेलकटपणा कमी करण्यास मदत करू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपाय करण्याआधी विषयाशी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)