आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या शरीरात हार्मोनल बदल दिसून येतात. शरीरात हार्मोनल बदल झाल्यामुळे अनेक समस्या होण्याची शक्यता अस्ते. योग्य आणि पोषक आहार नाही खाल्ल्यामुळे तुम्हाला मधुमेह, रक्तदब होण्याची शक्यता अस्ते.जगभरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. तुमच्या रक्तामधील साखरेचं प्रमाण वाढल्यावर तुम्हाला मधुमेह होऊ शकतो. पूर्वीच्या काळामध्ये एका ठराविक वयोगटामध्ये मधुमेहाचा त्रास होण्याची शक्यता असायची. परंतु आजकाल जंक फूडच्या अतिसेवनामुळे लहानमुलांमध्ये देखील मधुमेहाचा धोका दिसून येतो.
गेल्या काही वर्षात मधुमेहाच्या रुग्णांचा आकडा शहरी भागामध्ये वाढला आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचे असते. ३० ते ४० वर्षांच्या लोकांमध्ये मधुमेहाचा प्रभाव जास्त प्रमाणात दिसून येतो. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्याससाठी नेमकं कोणत्या पदार्थांचे सेवन केले पाहिजेल चला जाणून घेऊया. माहितीनुसार, दोन प्रकारचे मधुमेह आहेत. मधुमेहाचा पहिला प्रकार खराब जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे होतो. तर टाईप २ मधुमेह अनुवांशिक असतो. चला तर जाणून घेऊया मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी नेमकं काय करावं?
फॉलो करा सोप्या ट्रिक्स
मधुमेहाच्या रुग्णांसाठी दिवसभरातून कमीत कमी अर्धा ते एक तास चालणे गरजेचे असते. दररोज सकाळी ४ ते ५ किलोमीटर चालल्यामुळे तुमची पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. त्यासोबतच तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित रहाण्यास मदत होते. रिपोर्ट्सनुसार, मधुमेहाचा धोका टळण्यासाठी दररोज नियमित चालणे गरजेचे असते.
दरोरज सकाळी नियमित योगा करा. योगा केल्यामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्स सुरळीत राहाण्यास मदत होते. त्यासोबतच रक्तामधील ससाखरेची पातळी नियंत्रित राहाते. योगा केल्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. सकाळी लवकर उठल्यावर योगासने करा यामुळे मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते.
मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तुमच्या आहारात कार्बोहायड्रेट्स, गुड फॅट्स, प्रथिने आणि जीवनसत्वे यासारख्या घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे.
मधुमेहाचा धेका कमी करण्यासाठी तुमच्या वजनाकडे देखील विशेष लक्ष दिले पाहिजेल. वाढलेल्या वजनामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. वजन वाढल्यावर अनेक समस्या होऊ शकतात.
मधुमेहाच्या रुग्णांना भरपूर प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. दिवससभरातून ५ ते ६ लिटर पाणी प्यायल्यास मधुमेहाचा धोका कमी होम्यास मदत होते. त्यासोबतच रात्री लवकर जेवण्याची सवय असावी त्यामुळे जेवणाचे योग्य पचन होते आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या होत नाहीत.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)