रोज ‘एवढी’ पावलं चालाल तर हार्ट ॲटॅकपासून होऊ शकतो बचाव, मिळतील अनेक फायदे

| Updated on: Jan 05, 2023 | 5:18 PM

हार्ट ॲटॅकपासून बचाव करायचा असेल तर रोज चालायचा व्यायाम करणे महत्वाचे ठरते. यामुळे इतर आजारांचा धोकाही कमी होतो.

रोज एवढी पावलं चालाल तर हार्ट ॲटॅकपासून होऊ शकतो बचाव, मिळतील अनेक फायदे
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यांत हृदयविकाराच्या (heart disease) रुग्णांमध्ये खूप वाढ झाली आहे. कोरोना व्हायरस, चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी तसेच व्यायामाचा अभाव यामुळे हृदयविकार वाढत आहेत. हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी डॉक्टरही अनेक उपाय सांगतात. याच संदर्भात आता अशी माहिती समोर आली आहे की दररोज 6,000 ते 9,000 पावले चालल्याने (walking exercise), हृदयविकाराचा धोका (CVD)लक्षणीयरीत्या कमी केला जाऊ शकतो. जर्नल सर्क्युलेशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात (study)ही माहिती समोर आली आहे.

या अभ्यासात अमेरिका आणि 42 इतर देशांमधील 20,000 पेक्षा अधिक लोकांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले होते. या संशोधनात सहभागी झालेल्या लोकांचे सरासरी वय 63 होते ज्यामध्ये 52 टक्के महिला होत्या. त्यामध्ये संशोधकांना असे आढळून आले की दररोज 2,000 पावले चालणाऱ्यांच्या तुलनेत रोज 6,000 ते 9,000 पावले चालणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसह हृदयविकाराचा धोका 40 ते 50 टक्के कमी असतो. मॅसॅच्युएट्स युनिव्हर्सिटीचे प्रमुख लेखक डॉ. अमांडा पालुच यांनी सांगितले की चालण्याच्या व्यायामाने हार्ट ॲटॅकचा धोका कमी होतो, असे दिसून आले.

अशी चाला रोज 9000 पावले

हे सुद्धा वाचा

या संशोधनात सामील झालेल्या डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, एका दिवसात 9,000 पावलं चालणे कठीण नाही. जर तुम्ही जागरुक असाल आणि तुमची शारीरिक हालचाल वाढवण्यासाठी जागरुकपणे पावले उचलली तर तुम्ही हे लक्ष्य सहज साध्य करू शकात. त्यासाठी तुम्ही इमारतीत लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करणे, आपली गाडी थोडी लांब पार्क करणे, जवळच्या कामासाठी गाडी न वापरता चालत जाणे, असे उपाय करू शकता, त्यामुळे तुमचे ९००० पावलांचे ध्येय सहज साध्य होऊ शकेल. अगदी पहिल्या दिवसापासून तुम्हाला लक्ष्य साध्य करण्याची गरज नाही, परंतु त्यासाठी तुम्ही हळूहळू प्रयत्न वाढवू शकता. एक आठवडा चालताना 500 पावले वाढवण्याचा प्रयत्न करा आणि नंतर तुमचे ध्येय गाठेपर्यंत प्रत्येक आठवड्यात 500 पावले वाढवत जावीत. असं करत करत हळूहळू तुम्ही दररोज 9000 पावलं चालू शकाल.

दररोज चालण्याचे आहेत अवनेक फायदे

आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी चालणे फायदेशीर असल्याच्या संदेशाला या अभ्यासाद्वारे पुष्टी मिळते. दिवसातून 6,000 हून अधिक पावले चालल्याने स्नायूंमध्ये इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी होते, जळजळ कमी होते, तसेच याचा आपल्या हृदयाला फायदा होतो. यामुळे ब्लड प्रेशर आणि शरीराचे वजनही नियंत्रणात राहते. तसेच चालण्याच्या व्यायामामुळे बद्धकोष्ठता आणि डिप्रेशनचा धोकाही कमी होतो. प्रति मिनिट 100 पावले अशा वेगाने चालणे हे उपयुक्त आहे. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, जे घरून काम करतात (work from home) त्यांच्यासाठी हा अभ्यास विशेष महत्त्वाचा ठरतो. कारण त्यांना चालण्यासाठी अजिबात वेळ देता येत नाही.