मुंबई : ज्याप्रमाणे वयामुळे आपले शरीर थकत असते, त्याच पध्दतीने वयानुसार आपल्या मानसिक आरोग्यावरही (mental health) परिणाम होत असतो. एका विशिष्ट वयात ज्येष्ठ नागरिकांमध्ये अनेक मानसिक आजारांची लक्षणे दिसू लागतात. याला जीवनातील अनेक घटक कारणीभूत असले तरी, तणावपूर्ण जीवन हे यातील महत्वाचे व मुख्य कारण सांगता येईल. वाढत्या वयात मानसिक आजार (Mental illness) सामान्य असले तरी, तेच आजार लहान मुलांमध्ये दिसून येत असतील तर याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक ठरत असते. लहानपणापासून मुलांमध्ये मानसिकदृष्ट्या दुबळेपणा आल्यास याचे दीर्घ परिणाम (Long lasting results) त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात त्रासदायक ठरु शकतात. त्यामुळे मुलांचे मानसिक आरोग्य उत्तम राहिल, यासाठी पालकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
धावपळीच्या जगात अनेक पालक आपल्या मुलांना पुरेसा वेळ देत नाही. त्यांच्या भावना समजून घेण्यास ते अपयशी ठरत असतात. त्याच प्रमाणे वागणूक अतिशय कठोर ठेवत असल्याने मुलांच्या भावना समजून घेण्याची पालकांची मानसिक तयारी नसते. परंतु अशा पध्दतीने मुलांच्या मानसिकतेवर खूप वाईट परिणाम होउ शकतो. मुलांना पुरेसा वेळ द्यावा, त्याच्याशी संवाद साधावा, त्यांच्या मनात काय चालू आहे, हे ओळखून त्यांच्याशी वागावे, अशाने मुलांमध्ये आणि पालकांमध्ये एक घट्ट नाते तयार होउन मुलं मन मोकळं करु शकतील.
अनेकदा मुलं हट्ट करतात, एखादी गोष्ट पाहिजे असल्यास ती मिळेपर्यंत ते शांत होत नाहीत. अशा वेळी पालक त्यांच्यावर संताप करतात, अनेकदा मुलांना मारही खावा लागत असतो. परंतु हे अतिशय चुकीचे आहे. अशा वागणुकीमुळे मुलांमध्ये पालकांबद्दल नकारात्मक भावना निर्माण होते. त्यामुळे मुलांशी नेहमी सकारात्मक बोला, त्यांना शांतपणे समजवून सांगा.
अनेकदा काही कारणांमुळे मुलांमध्ये एकटेपणाची भावना निर्माण होऊ शकते. अशा वेळी तुम्ही त्यांना मोकळ्या हवेत घेउन गेले पाहिजे. त्यांच्या वयाच्या मुलांसोबत त्यांना खेळू द्यावे, त्यांना समाजात मिसळू द्यावे, मुलं जेवढी सोशल होतील तेवढ त्यांचे व्यक्तीमत्व अधिक खुलण्यास मदत होते. मुलांना घरातच ठेवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. ऐवढेच नाही तर, दुसर्याशी बोलताना ते प्रचंड घाबरतात, त्याच्या मनात भीती निर्माण होते.
इतर बातम्या
Health Care | तुम्हाला वारंवार तहान लागतेय? ‘या’ गंभीर आजाराचेही असू शकते लक्षण
World Parkinson’s Day : जागतिक पार्किन्सन्स दिन म्हणजे काय ? जाणून घ्या एका क्लिकवर