Nose Bleeding : तुमच्या नाकातून वारंवार रक्त येते का ? हे नॉर्मल नाही, असू शकते या आजाराचे लक्षण

| Updated on: Mar 08, 2023 | 7:44 AM

नाकातून वारंवार रक्त येणे हे सिरोसिसचे एक लक्षण आहे, ज्याला एपिस्टेक्सिस असेही म्हटले जाते. वारंवार नाक वाहणे, रक्तस्त्राव होणे हे फॅटी लिव्हरचेही लक्षण असू शकते. त्याकडे दुर्लक्ष करू नका.

Nose Bleeding : तुमच्या नाकातून वारंवार रक्त येते का ? हे नॉर्मल नाही, असू शकते या आजाराचे लक्षण
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली : जास्त मद्यपान केल्याने किंवा जास्त कॅलरीज खाल्ल्याने यकृतामध्ये (fat in liver) चरबी जमा होऊ शकते. फॅटी लिव्हर रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सहसा चेतावणीची कोणतीही चिन्हे नसतात. फॅटी लिव्हरमुळे (fatty liver) शरीराच्या कोणत्याही भागात सूज येऊ शकते. याला नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस म्हणतात. सतत जळजळ झाल्यामुळे यकृतावर डाग येऊ शकतात, ज्याला फायब्रोसिस (Fibrosis) असे म्हणतात. दुर्लक्ष केल्यास ते सिरोसिसमध्ये बदलू शकते, जो फॅटी लिव्हर आजाराचा सर्वात धोकादायक टप्पा आहे.

त्याची आणखी लक्षणे काय आहेत व कशी काळजी घेतली पाहिजे ते जाणून घेऊया.

नाकातून रक्तस्त्राव झाल्यास घ्या काळजी

हे सुद्धा वाचा

सिरोसिसचे एक लक्षण म्हणजे नाकातून वारंवार रक्त येणे, ज्याला एपिस्टॅक्सिस असेही म्हणतात. वारंवार नाकातून रक्तस्त्राव होणे हे फॅटी लिव्हरचे लक्षण असू शकते कारण तुमच्या शरीरात रक्तस्त्राव होण्याची अधिक शक्यता असते. यामुळे हिरड्यांना इजा होऊ शकते तसेच रक्तस्त्राव देखील होऊ शकतो.

सिरोसिसची अन्य लक्षणे

नाकातून रक्तस्त्राव होण्यासोबतच, सिरोसिसच्या इतर लक्षणांमध्ये थकवा, अशक्तपणा, भूक न लागणे, वजन कमी होणे आणि स्नायू कमकुवत होणे, आजारी वाटणे आणि उलट्या होणे, त्वचा पिवळी पडणे आणि डोळे पांढरे होणे या लक्षणांचाही समावेश होतो. केस गळणे, ताप येणे आणि थरथर जाणवणे, पायांना सूज येणे ही देखील सिरोसिसची लक्षणे असू शकतात.,

व्यक्तीमत्वात बदल होणे, हेही असू शकते लक्षण

लिव्हर सिरोसिसशी संबंधित इतर आरोग्य समस्यांमध्ये एखाद्याच्या व्यक्तिमत्वात बदल होणे, कोणत्याही गोष्टीवर लक्ष नीट केंद्रित करण्यात अडचण आणि झोप नीट येणे, मध्येच जागे होणे अशा समस्यांचा समावेश होतो. एन्सेफॅलोपॅथी ही मेंदूच्या कोणत्याही रोगासाठी संज्ञा अथवा शब्द आहे, ज्यामुळे मेंदूच्या कार्यामध्ये बदल करते. जेव्हा विषारी पदार्थ तुमच्या मेंदूवर परिणाम करतात तेव्हा असे होते कारण तुमचे यकृत ते (विषारी पदार्थ) तुमच्या शरीरातून काढून टाकण्यास असमर्थ असते. असे अनेक घटक आहेत जे फॅटी लिव्हरचा रोगाचा धोका वाढवू शकतात. यामध्ये लठ्ठपणा किंवा जास्त वजन, टाइप 2 मधुमेहा यांचाही समावेश आहे.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)