Side Effects Of Frozen Foods: फ्रोझन फूडमुळे होऊ शकते आरोग्याचे नुकसान, जाणून घ्या दुष्परिणाम

| Updated on: Dec 28, 2022 | 4:30 PM

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे फ्रोझन फूडचा (गोठवलेले पदार्थ) वापर वाढला आहे, कारण ते तयार करण्यास फार वेळ लागत नाही. मात्र यामुळे आपल्या आरोग्याचे मोठे नुकसान होते. त्यामध्ये अधिक प्रमाणात सोडिअम असते.

Side Effects Of Frozen Foods: फ्रोझन फूडमुळे होऊ शकते आरोग्याचे नुकसान, जाणून घ्या दुष्परिणाम
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये लोकांना शांतपणे बसून जेवायलाही (to eat) वेळ मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीही फार बदलल्या आहेत. हातात वेळ कमी असल्यामुळे लोका बऱ्याच वेळेस पदार्थ बाहेरून मागवून खातात किंवा मग अशा पदार्थांची निवड करतात, जे झटपट तयार होतील. फ्रोझन पदार्थ (गोठवलेले) हेही (frozen food) याच श्रेणीमध्ये येतात. हे पदार्थ पॅक्ड असतात, जे कापायची किंवा सोलायची गरज नसते, तसेच ते साठवून ठेवणही सोपं असतं. केवळ पदार्थाचे पॅकेट उघडा, शिजवा आणि खा असे हे पदार्थ असतात. मात्र याच फ्रोझन फूडमुळे आपल्या आरोग्याचे (side effects of frozen food) मोठे नुकसान होते.

फ्रोझन फूडमध्ये अधिक प्रमाणात सोडिअम असते. त्यांच्यामध्ये पोषक तत्वं कमी असल्याने त्यांच्या नियमित सेवनाने आपल्याला अनेक आजार होऊ शकतात, हे तुम्हाला माहीत आहे का ? अशा वेळी तुम्हाला स्वस्थ रहायचे असेल तर जेवणात ताज्या भाज्या व फळांचा समावेश करावा. फ्रोझन फूडमुळे काय नुकसान होते, ते जाणून घेऊया.

1) उच्च रक्तदाब

हे सुद्धा वाचा

फ्रोझन फूडमध्ये सोडिअमचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. जर तुम्ही या पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केले तर शरीरातील सोडिअमची पातळी वाढू शकते आणि उच्च रक्तदाबाची त्रास होऊ शकतो.

2) स्नायूंचे नुकसान

रिपोर्ट्सनुसार, फ्रोझन फूडमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते, त्यामुळे हे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळत नाही. कमी कॅलरीचे सेवन केल्यास शरीरातील स्नायूंना इजा होऊ शकते.

3) वजन वाढू शकते

फ्रोझन फूडमध्ये कार्बोहायड्रेट्स अधिक प्रमाणात असतात. त्यांच्या अधिक सेवनाने वजन वाढू शकते. त्यामुळे फ्रोझन फूडचे जास्त सेवन करू नये, अन्यथा लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते.

4) हृदयाशी संबंधित समस्या

या पदार्थांमध्ये असलेले ट्रान्स फॅट्स हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल कमी करतात. त्यामुळे ते हृदयासाठी हानिकारक ठरते. हृदय निरोगी ठेवायचे असेल तर फ्रोझन फूड खाणे टाळा.

5) मधुमेह

फ्रोझन फूड हे ताजे ठेवण्यासाठी स्टार्चचा वापर केला जातो. त्यामुळे अन्नाची चव तर वाढते, पण अन्न पचण्यापूर्वी साखरेमध्ये रुपांतर होते. ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते व मधुमेहाचा धोका संभावतो. त्यामुळे जास्त प्रमाणात फ्रोझन फूडचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)