Health : पावसाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवायच असेल तर या फळांचा ज्यूस नक्की प्या

| Updated on: Jun 30, 2023 | 8:34 PM

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुमची रोगप्रतिकारक शक्ती स्ट्राँग करायची असेल तर 5 प्रकारच्या नैसर्गिक रसांचा तुमच्या आहारात करा. तर हे 5 रस कोणते याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

Health : पावसाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवायच असेल तर या फळांचा ज्यूस नक्की प्या
Fruit Juices
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे. पण पावसाळ्यात भिजल्यामुळे लोकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. मग सर्दी, ताप असे अनेक आजार लोकांना होताना दिसतात. अशावेळी आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील स्ट्राँग असणं गरजेचं आहे. जर तुम्हालाही या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुमची रोगप्रतिकारक शक्ती स्ट्राँग करायची असेल तर 5 प्रकारच्या नैसर्गिक रसांचा तुमच्या आहारात करा. तर हे 5 रस कोणते याबाबत जाणून घ्या.

जांभळाचा ज्यूस- जांभूळ हे फळ आरोग्यदायी असं फळ आहे. जांभूळ हे उन्हाळी हंगामातील फळ असून ते एकदम चविष्ट असे फळ आहे. हे फळ चवीला जेवढं चविष्ट आहे तितकंच ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण या फळात व्हिटॅमिन सी असते. तसंच जांभूळ खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे पावसाळ्यात जांभळाचा रस आवर्जून प्या यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून सुरक्षित राहाल.

फालसा ज्यूस- फालसा या फळाचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे तुमच्या आहारात या फळाचा रस नक्की समाविष्ट करा. कारण या यामध्ये कॅल्शियम, प्रथिने, मॅग्नेशियम असे घटक आढळतात. त्यामुळे फालसा रसचं सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.

चेरी ज्यूस- लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला चेरी खायला आवडते. ही चेरी जेवढी गोड असते तेवढंच तिचा रस शरीरासाठी आरोग्यदायी असतो. कारण चेरीत अँटिऑक्सिडंट आढळतात. सोबतच चेरीच्या ज्यूसमधील व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम असे घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

डाळिंबाचा ज्यूस- डाळिंब हे फळ खायला जितके चविष्ट असते तितकंच ते शरीरासाठी फायदेशीर असतं. त्यामुळे डाळिंबाच्या रसाचं सेवन प्रत्येकानं केलं पाहीजे. डाळिंबामुळे शरीरातील रक्त वाढते. तसंच शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही वाढवते.

संत्र्याचा ज्यूस- संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे तुमच्या आहारात संत्र्याच्या ज्यूसचा समावेश आवर्जून करा. कारण या ज्यूसचं सेवन केल्याने तुमचं अनेक आजारांपासून संरक्षण होऊ शकतं.