नवी दिल्ली : देशभरात अनेक ठिकाणी कोरोना लसीची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट (NTAGI) कोरोना लसीच्या तुटवड्यावरुन अनेक शिफारसी केल्या आहेत. यानुसार कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यापर्यंत वाढवण्याची सूचना दिली आहे. तसेच ज्यांना कोरोनाची लागण झाली, त्यांनी सहा महिन्यांनंतर लस घ्यावी, असेही यात म्हटले आहे. (Gap between Covishield doses should be increased to 12-16 weeks said NTAGI)
NTAGI ची शिफारस काय?
NTAGI ने दिलेल्या माहितीनुसार, गर्भवती महिला कोरोना लस घेऊ शकतात. तसेच प्रसूती झालेली किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांना लस दिली जाऊ सकते. मात्र जर तुम्हाला कोरोनाची लागण झाली असेल, तर तुम्ही सहा महिन्यानंतर कोरोनाची लस घ्यावी, असा सल्ला दिला आहे.
एनटीजीआयच्या शिफारसीआधी डॉक्टरांनी कोरोनाची लागण झालेल्यांनी तीन महिन्यानंतर लस घ्यावी असे सांगितले होते. सीडीसी यूएसच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, कोरोना रिकव्हरी 90 दिवसानंतर लस देण्याची शिफारस केली होती. मात्र त्यात अद्याप कोणतेही बदल केले नाहीत.
कोवॅक्सिनच्या दोन डोस अंतरामध्ये बदल नाही
त्यासोबत कोविशील्डच्या दोन डोस 12 ते 16 आठवड्यांच्या अंतराने द्यावे, अशी शिफारस केली आहे. सध्या आता कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर हे चार ते आठ आठवडे इतके आहे. मात्र कोवॅक्सिनच्या दोन डोस अंतरामध्ये कोणताही बदल सुचविला जात नाही. एनटीजीआयने शिफारसी आता राष्ट्रीय तज्ज्ञ गटाकडे पाठवल्या जातील.
दुसरा डोस वेळेवर घ्यावा, अशी सूचना
दरम्यान, नुकतंच एका अभ्यास केलेल्या दाव्यानुसार, कोरोना लसीचा दुसरा डोस उशिरा दिल्या कोरोना बळींच्या संख्येत वाढ होऊ शकते. तसेच 65 वर्षांपेक्षा कमी असलेल्या लोकांसाठी ही सूचना केली आहे.
Elon Musk: एलन मस्कचं एक ट्विट, बिटकॉईनच्या किमतीत हजारो डॉलर्सची घसरण, टेस्लाच्या प्रमुखानं काय म्हटलं?https://t.co/W3OhRJ7jRw#ElonMusk | #tesla | #Bitcoin | #cryptocurrency
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 13, 2021
(Gap between Covishield doses should be increased to 12-16 weeks said NTAGI)
संबंधित बातम्या :
भारतात कोरोना संपण्यासाठी ‘हा’ एकमेव उपाय, अमेरिकेच्या मुख्य आरोग्य सल्लागारांकडून सुतोवाच
Mucor mycosis or Black Fungus | अशाप्रकारे टाळा म्युकोर मायकोसिस संक्रमणाचा धोका; ही घ्या काळजी
मोठी बातमी! भारतात आता लहान मुलांनाही कोरोनाची लस; 2 ते 18 वर्षाच्या मुलांवरील ट्रायलला मंजुरी