मुंबई : सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे अनेक वेगवेगळे आजार निर्माण होताना दिसतात. बदलत्या वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शन देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसते. या वातावरणामध्ये व्हायरल आणि बॅक्टेरियाचे संसर्ग झपाट्याने वाढतात. मग सर्दी, खोकला अशा आजारांना सामोरे जावं लागू शकतं. ऑक्टोबरच्या या महिन्यात हवामान बदलते त्यामुळे सर्दी, ताप, खोकला अशा समस्या निर्माण होतात. तसेच लोकांची प्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते. तर या आजारांवरती मात करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती स्ट्राँग करण्यासाठी आपल्या आहारात काही फळांचा समावेश करणे गरजेचे आहे.
पेरू – बहुतेक लोकांना पेरू हे फळ खायला आवडते. तर ऑक्टोबर महिन्यात पेरू हे फळ बाजारात सर्वत्र उपलब्ध होते. पेरू हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. कारण पेरूमध्ये विटामिन सी असते जे आपल्याला अनेक आजारांपासून वाचवते. तसेच आपली रोगप्रतिकार शक्ती देखील वाढण्यास मदत होते.
पपई – पपई आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पपईमध्ये देखील विटामिन सी असते जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते. तसेच व्हायरल आणि बॅक्टेरियाचा संसर्गचा धोका देखील कमी होण्यास मदत होते. त्यामुळे पपई आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे.
डाळिंब – डाळिंब हे बदलत्या ऋतूत खूप फायदेशीर असते. डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट, विटामिन सी असे गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी गुणकारी असतात. डाळिंबामुळे आपल्या शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते. तसेच वायरल आणि संसर्गजन्य आजारांपासून देखील आपली सुटका होण्यास मदत होते.
किवी – किवी या फळामुळे आपल्या पांढऱ्या रक्तातील पेशी वाढवण्यास मदत होते. त्यामुळे पेशी कमी झाल्यानंतर किवी फळ खाणे गरजेचे आहे. तसेच किवीमध्ये पोटॅशियम, फॉलेट बी, विटामिन के आणि विटामिन सी आढळते जे आपल्या शरीराला खूप फायदेशीर असते.
लिंबूवर्गीय फळ – लिंबूवर्गीय फळांमध्ये विटामिन सी असते जे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. लिंबूवर्गीय फळांमध्ये तुम्ही संत्री, मोसंबी, लिंबू, द्राक्षं अशा फळांचा समावेश करू शकता. तर अशी लिंबूवर्गीय फळ देखील आपल्या शरीरासाठी गुणकारी असतात.