Health : गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे शरीरासाठी घातक, दिवसभरात किती पाणी प्यावे?

| Updated on: Oct 20, 2023 | 1:25 PM

धक्कादायक बाब म्हणजे जास्त पाणी पिणे इतके हानिकारक असू शकते की ते तुमचा जीव देखील घेऊ शकते. जास्त पाणी प्यायल्याने शरीरीमध्ये काही धोके निर्माण होतात. या लेखात आपण जाणून घेणार आहोत की पाणी पिण्याचे योग्य प्रमाण काय आहे. तसेच अती पाणी पिल्याने त्याचे विषात (Over Hydration)  कसे रूपांतर होते.

Health : गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे शरीरासाठी घातक, दिवसभरात किती पाणी प्यावे?
ओव्हरहायड्रेशन
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : पाणी पिणे शरीरासाठी खूप महत्वाचे आहे, पाण्याला जीवन असे नाव देण्यात आलेले आहे. परंतु गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे शरीरासाठी  हानिकारक ठरू शकते. धक्कादायक बाब म्हणजे जास्त पाणी पिणे इतके हानिकारक असू शकते की ते तुमचा जीव देखील घेऊ शकते. जास्त पाणी प्यायल्याने शरीरीमध्ये काही धोके निर्माण होतात. या लेखात आपण जाणून घेणार आहोत की पाणी पिण्याचे योग्य प्रमाण काय आहे. तसेच अती पाणी पिल्याने त्याचे विषात (Over Hydration)  कसे रूपांतर होते. त्याची लक्षणे काय आहेत? त्याच वेळी, आपण हे कसे टाळू शकतो हे देखील पाहूया. जास्त पाणी प्यायल्याने पाण्याची विषारीता निर्माण होते. या आजारात किडनीमध्ये पाणी साचू लागते. त्यामुळे रक्तात सोडियम जमा होऊ लागते. त्याशरीराला पाणी पचण्यास त्रास होऊ लागतो. ज्यामुळे भविष्यात अनेक समस्या निर्माण होतात.

पाण्याच्या विषारीपणाची प्रारंभिक लक्षणे

शरीराला जास्त पाणी मिळते म्हणून पाण्याच्या विषारीपणाचा विचार करा. ज्यामुळे ओव्हर हायड्रेशन होते. अशा परिस्थितीत काय होते की शरीर काही वेळानंतर पाणी शोषण्यास सक्षम राहात नाही. त्यामुळे पाणी बाहेर येण्याचा प्रयत्न होतो.

  • ओव्हर हायड्रेशनमुळे शरीराला थकवा, सुस्त आणि कमी ऊर्जा जाणवू लागते.
  • डोकेदुखीसोबतच अंगदुखीचीही समस्या जाणवते.
  • उलट्यांसह मळमळ होण्याची भावना
  • शौचालयात वारंवार जावे लागते.

जर तुम्हाला हा आजार टाळायचा असेल तर तुम्हाला या टिप्स फॉलो कराव्या लागतील

  • पाण्याचे विषारीपणा टाळायचा असेल तर हे काम करावे लागेल
  • जर तुम्ही व्यायामादरम्यान जास्त पाणी पित असाल तर तुम्ही इलेक्ट्रोलाइट्स प्यावे.
  • इलेक्ट्रोलाइट्ससोबतच फळांचा रस आणि नारळ पाणी प्यावे.
  • तहान लागल्यावर एकाच वेळी भरपूर पाणी पिणे योग्य नाही.
  • तुमच्या शरीरानुसार पाणी प्या

एका दिवसात शरीरासाठी किती पाणी आवश्यक आहे?

तज्ज्ञांच्या मते, दिवसाला तीन लिटर पाणी पिणे चांगले आहे. पण तुम्हाला तुमच्या शरीराकडेही पाहावे लागेल. जर तुमचे शरीर असे आहे की तुम्ही 3 लिटर पिऊ शकता, तरच प्या. एवढे पाणी पिणे शक्य नसेल तर जबरदस्ती करू नका. पाणी एकाच वेळी पिण्याऐवजी हळूहळू पिणे चांगले. त्यामुळे तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचणार नाही.

हे सुद्धा वाचा

(टिप: कोणताही उपाय हा तज्ञांच्या सल्ल्याने करावा)