मुंबई, भारतात हिवाळा हा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा काळ मानला जातो. हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने अनेक पदार्थ बनविण्याचे पर्याय उपलब्ध असतात. याशिवाय हळदीचे दूध (Turmeric Milk) भारतात शतकानुशतके प्याले जाते. विशेषतः हिवाळ्यात हळदीचे दूध पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हळदीच्या दुधामुळे रोगप्रतिकारक शक्ती (Immunity power) मजबूत होते आणि शरीराला संसर्गाशी लढण्याची शक्ती मिळते. सर्दी, फ्लू, खोकला यांसारखे संसर्ग हिवाळ्यात सर्वांनाच त्रास देतात. यावर हळदीचे दूध फायदेशीर आहे.
हळदीचे दुःख बनविण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते आपण जाणून घेऊया. यासाठी प्रथम एका भांड्यात दूध टाकून गॅसवर ठेवा आणि नंतर त्यात चिमूटभर हळद टाका. ते गरम झाल्यावर ग्लासमध्ये ओतून प्या. या दुधात हळदीशिवाय वेलचीचे दाणे, काळी मिरी पावडर, लवंग, दालचिनी इ.ही टाकू शकता. गर्भवती महिलांनी हे दूध डॉक्टरांच्या सल्ल्याने प्यावे.
हळदीचे दूध नेहमी कोमट प्यावे आणि तेही झोपण्यापूर्वी प्यावे असा सल्ला आहार तज्ज्ञांनी दिला आहे. असे मानले जाते की, हळदीचे दूध झोप येण्यास मदत करते. निद्रानाशाचा त्रास असल्यास झोपण्यापूर्वी हळदीचे कोमट दूध अवश्य प्यावे. तुम्हाला तुधाची ऍलर्जी असेल तर तुम्ही ताकात हळद घालून दूध पिऊ शकता.