मुंबई, हृदयविकाराचा त्रास किंवा हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आलेल्या व्यक्तीच्या हृदयात स्टेंट टाकला जातो, त्याला अँजिओप्लास्टी (Angioplasty) म्हणतात. या शस्त्रक्रियेमध्ये ब्लॉक झालेल्या वाहिन्या उघडण्यासाठी स्टेंट टाकला जातो. जे ब्लॉकेज उघडण्यास मदत करते. अँजिओप्लास्टी ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या उघडल्या जातात. हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघातानंतर डॉक्टर अनेकदा अँजिओप्लास्टीचा अवलंब करतात.
अँजिओप्लास्टी केल्यानंतर, रुग्ण 2 ते 3 दिवसांनंतर सामान्य दिनचर्या सुरू करु शकतो, परंतु डॉक्टर स्टेंट टाकल्यानंतर तुम्हाला निरोगी जीवनशैली जगण्याचा सल्ला देतात, अयशस्वी झाल्यास पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता भासू शकते.
अँजिओप्लास्टीनंतर डॉक्टरांनी दिलेली औषधं चुकवू नका. औषधं घेतली नाहीत तर यामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात. याशिवाय रक्तस्रावाचा त्रासही होऊ शकतो.
अँजिओप्लास्टीनंतर अनेकजण बिनधास्त होऊन जीवन जगतात. मात्र हे चुकीचे आहे. अँजिओप्लास्टी केल्यानंतर, रुग्णांनी तेलकट किंवा तिखट-मसालेदार अन्न टाळावे.
अर्थात, अँजिओप्लास्टीनंतर खबरदारी घ्यावी लागते, परंतु याचा अर्थ असा नाही की दिवसभर आरामच करावा. शरीराची हालचाल होणे आवश्यक आहे. जास्त वेळ एकाच स्थितीत राहू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने रोज पै चाला मात्र जड उचलणे, पायऱ्यांचा अतिवापर टाळा.
शस्त्रक्रियेनंतर छातीत दुखणे, अपचन, धाप लागणे किंवा इतर कोणतीही समस्या असल्यास उशीर न करता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. थोड्याशा निष्काळजीपणाचेही वाईट परिणाम भोगावे लागतात.
हृदयात स्टेंट टाकल्यानंतर शरीराला हलके सक्रिय ठेवण्याबरोबरच विश्रांतीही घ्यावी लागते. तुम्ही ऑफिसला गेलात तर कामाच्या दरम्यान थोडा वेळ आराम करा. फक्त सकस आहार घ्या. कामाच्या दरम्यान जास्त चहा किंवा कॉफी पिणे टाळा.