मुंबई, गेल्या काही वर्षांत मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांची संख्या वाढली आहे. चुकीची जीवनशैली (Bad Lifestyle), खाण्याच्या सवयी, अपुरी झोप आणि तणाव (Stress) यांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. साखरेची पातळी वाढत असल्याचे अनेकांच्या लक्षात येत नाही. त्यांची तपासणी केली असता त्यांना अचानक मधुमेह झाल्याचे कळल्यावर अनेकांना धक्का बसतो. तुमच्या शरीरातून येणा-या सूचनांकडे लक्ष दिल्यास मधुमेहाची काही लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे वेळीच ओळखली आणि उपचार केल्यास रक्तातील साखर वाढण्यापासून रोखता येते.
घाम येणे आणि चक्कर येणे ही मधुमेहाची प्राथमिक लक्षणे आहेत. रक्तातील साखरेची पातळी वाढली की शरीराचे अंतर्गत तापमान असंतुलित होऊ लागते. मधुमेहामुळे शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता बिघडते. यामुळे जास्त घाम येणे किंवा खूप कमी घाम येणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. घाम येणे, चक्कर येणे आणि पायाला मुंग्या येणे ही मधुमेहाची प्रमुख लक्षणे आहेत.
जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते परंतु मधुमेहाच्या पातळीपर्यंत पोहोचत नाही. या स्थितीला प्रीडायबेटिक म्हणतात. या अवस्थेत शरीरात अनेक बदल होतात. या लक्षणांमध्ये विशेष काही नाही. म्हणूनच अनेकांना ही लक्षणे सहज जाणवत नाहीत.
जर पुरुषांच्या कंबरेचा आकार 40 पेक्षा जास्त आणि महिलांच्या कंबरेचा आकार 35 पेक्षा जास्त असेल तर ते प्रीडायबेटिकचे लक्षण मानले जाते. ही लक्षणे कमी करण्यासाठी रोज अर्धा तास व्यायाम करावा. त्याचप्रमाणे उच्च फायबर आहार, कमी कॅलरीजचे सेवन, पुरेशी झोप आणि भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.