मुंबई, बदलत्या जीवनशालीचा आरोग्यावर होत असलेला प्रभाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यापैकी हृदयविकार हा अनेकांना मृत्यूच्या कवेत घेत आहे. अगदी तारुण्यातदेखील याचे बळी ठरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हृदयविकाराचा (heart attack) झटका कोणाहीसाठी धोकादायक असतो. पण पुरूषांच्या (men) तुलनेत स्त्रियांना (Women) हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्या मृत्यूची शक्यता जास्त असल्याचे अध्ययनात समोर आले आहे. पुरूषांच्या तुलनेत महिलांना वर्षाच्या आत दुसरा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते असे संशोधन सांगते.
स्त्रियांच्या शरीराची कार्यप्रणाली पुरूषांच्या तुलनेत वेगळी असते. तसेच जोखीम आणि रोगनिदानही वेगवेगळे असते. अनेक स्त्रियांना आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय असते त्यामुळे त्या वैद्यकीय मदत घेण्याची शक्यता कमी असते. हार्ट अटॅक येण्याआधी स्त्रियांमध्ये कोणती लक्षणं जाणवतात पाहूया.
जोखीम जास्त असलेल्या महिलांनी नियमित वैद्यकीय तपासणी करणे, जीवनशैलीत बदल करणे फार गरजेचे आहे. त्यामुळे हृदयविकाराचा धोका आणि मृत्यूची शक्यता कमी होऊ शकतो. जीवनशैलीतील काही महत्वाच्या बदलांमध्ये आहाराद्वारे वजनावर नियंत्रण ठेवणे आणि रोज 30 मिनिटे व्यायाम करणे महत्वाचे आहे.
आहारात भाज्या आणि फळे, कार्बोहायड्रेट्स आणि मासे किंवा बिया यांसारख्या ओमेगा-3-फॅटी ऍसिडमध्ये समृद्ध अन्नाचा समावेश असावा.