मुंबई : तुम्ही कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की महिलांना ठराविक वयानंतर वजन कमी (Weight Loss) करणे इतके अवघड का जाते? आपल्या शरीरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या महत्त्वाची भूमिका बजावतात. वजन कमी करणे कधीकधी खूप कठीण असते. जसजसे तुमचे वय वाढते तसतसे तुमचे शरीर, आहार, सवयी, झोपेचा पॅटर्न देखील बदलतो आणि या सर्व गोष्टींमुळे तुमचे वजन कमी करण्यात अडचणी निर्माण होतात.
हार्मोनल बदल- महिलांच्या आयुष्यात अनेक टप्पे असतात ज्यात मासिक पाळी, गर्भधारणा आणि नंतर रजोनिवृत्ती यांचा समावेश होतो. रजोनिवृत्ती हा एक नैसर्गिक जैविक टप्पा आहे ज्यामुळे महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. रजोनिवृत्तीच्या काळात महिलांच्या शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी कमी होऊ लागते ज्यामुळे चरबी वाढू लागते.
चयापचय मंदावणे- वयानुसार तुमचा चयापचय मंदावणे सामान्य आहे. वयाच्या 30 नंतर, चयापचय हळूहळू कमी होऊ लागते. जर तुमच्या खाण्याच्या सवयी बरोबर नसतील आणि तुम्ही नियमित व्यायाम करत नसाल तर त्यामुळे वजन वाढू शकते आणि हे वजन कमी करणे कठीण होऊ शकते.
झोपेचा पॅटर्न- तुमचे वय जसजसे वाढते तसतसे रात्री झोपणे खूप कठीण होते. हे वाढत्या वयामुळे होते. 5 ते 6 तासांची झोप घेण्यासाठी लोकांना खूप कष्ट करावे लागतात. योग्य झोप न मिळाल्यानेही वजन वाढू लागते.
वाईट जीवनशैली- जसजसे वय वाढते तसतशी तुमची जीवनशैली देखील कमी सक्रिय होऊ लागते. वयामुळे तुमची एनर्जी लेव्हलही मंदावते. याचे कारण दिवसभर काम करणे किंवा तुमची खराब जीवनशैली असू शकते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही सक्रिय जीवनशैली जगली पाहिजे.
वाढत्या वयामुळे स्नायूंची झीज – वाढत्या वयाबरोबर स्नायूंचे नुकसान होऊ लागते. त्यामुळे शरीरातील चरबी झपाट्याने वाढते. अशा परिस्थितीत तुम्ही जिममध्ये व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. आठवड्यातून तीन वेळा जिममध्ये जाण्याचा प्रयत्न करा.