Menopause : महिलांच्या आयुष्यातील एका विशिष्ट वयानंतर त्यांना मासिक पाळी येणे बंद होते. असे मानले जाते की जर एखाद्या महिलेला तिच्या शेवटच्या मासिक पाळीनंतर 12 महिने मासिक पाळी आली नसेल त नसेल तर तिला रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज आला आहे.रजोनिवृत्ती ही अशी स्थिती आहे जेव्हा मासिक पाळी पूर्णपणे थांबते. रजोनिवृत्ती म्हणजे स्त्रीमध्ये अंड्याचे उत्पादन पूर्णपणे थांबते आणि ती स्त्री आई होऊ शकत नाही. हे प्रामुख्याने 45 ते 55 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये दिसून येते. मासिक पाळीप्रमाणे, रजोनिवृत्ती अर्थात मेनोपॉज हा देखील प्रत्येक स्त्रीच्या जीवनाचा एक भाग आहे. त्याचा प्रत्येक स्त्रीला वयानुसार सामना करावा लागतो.
पण पीरियड्सप्रमाणेच रजोनिवृत्तीशी संबंधित अनेक समज-गैरसमज आहेत. त्याबद्दलच सविस्तर माहिती जाणून घेऊया.
1. रजोनिवृत्ती / मेनोपॉज सर्व स्त्रियांमध्ये समान असते
असं अजिबात नाही कारण प्रत्येक स्त्रीच्या सामाजिक-सांस्कृतिक, जैविक आणि जीवनशैलीशी संबंधित अनेक बदल होत असतात. हार्मोन्समधील अनेक बदलांमुळे, रजोनिवृत्ती प्रत्येक स्त्रीसाठी भिन्न असू शकते.
2. पन्नाशीत किंवा त्यानंतर मेनोपॉज सुरू होतो
यातही काही तथ्य नाही. हे प्रत्येक स्त्रीच्या वेगवेगळ्या जीवनशैलीवर देखील अवलंबून असते. रजोनिवृत्तीचे सामान्य वय 45 ते 55 वर्षे मानले जाते, परंतु हे वेगवेगळ्या स्त्रियांमध्ये हा काळ वेगवेगळ्या वेळी येऊ शकतो. काहींना लवकर मेनोपॉज येऊ शकतो, तर काहींना उशीरा.
3. मेनोपॉज नंतर वजन वाढतेच
वजन वाढणे हे रजोनिवृत्तीवर किंवा मेनोपॉज अवलंबून नसते. कारण रजोनिवृत्ती असो वा नसो, वाढत्या वयाबरोबर स्त्रियांमध्ये चयापचय अर्थात मेटाबॉलिज्म मंदावतो, त्यामुळे वजन वाढण्यासारख्या समस्या अनेक स्त्रियांमध्ये दिसून येतात, परंतु रजोनिवृत्तीशी त्याचा थेट संबंध नाही.
4. रजोनिवृत्तीमुळे लैंगिक इच्छा कमी होते
हे देखील पूर्णपणे तथ्यांवर आधारित नाही. कारण रजोनिवृत्तीचा आपल्या लैंगिक संबंधांवर विशेष परिणाम होत नाही. तथापि, वाढत्या वयाबरोबर आपली ताकद कमी होते आणि योनीमध्ये कोरडेपणा येतो. त्यामुळे लैंगिक इच्छा कमी होते.
5. मेनोपॉज नंतर हॉट फ्लॅशेस हे सामान्य आहे
हॉट फ्लॅश म्हणजे अचानक खूप उकडणे किंवा गरम वाटू लागणे. हे जरी सामान्य असले तरी हे प्रत्येक स्त्रीला लागू होत नाही. रजोनिवृत्ती सुरू झाल्यानंतर दोन वर्षांच्या आत हॉट फ्लॅश होतात पण असे म्हटले जात असले तरी 60 टक्के महिलांमध्ये काही काळानंतर ते थांबतात.
6. मेनोपॉज नंतर डिप्रेशन, बेचैनी आणि मूड स्विंग्स सामान्य असतात
रजोनिवृत्तीचा किंवा मेनोपॉजचा डिप्रेशन, तणावाशी थेट संबंध नाही. पण नैराश्य, झोप न लागणे आणि हॉट फ्लॅशेस यामुळे अनेक स्त्रियांची चिडचिड होऊ शकते.