नवी दिल्ली – देशातील अनेक राज्यांसाह उत्तर भारतात आणि राजधानी दिल्लीमध्ये थंडीचा प्रकोप (cold wave) वाढतच चालला आहे. गेल्या काही दिवसांत थंडीचा कडाका भलताच वाढला आहे. थंडीमुळे उत्तर भारतात ब्रेन स्ट्रोक (brain stroke) आणि हार्ट ॲटॅकच्या (heart attack) केसेसही वाढल्या आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम झाला असून उत्तर भारतामध्ये थंडीच्या तीव्र लाटेमुळे 25 जणांचा मृत्यू (death)झाल्याची घटना घडली. काही ठिकाणी पारा 1अंशापर्यंत घसरला होता.
सतत घसरणाऱ्या तापमानामुळे हार्ट ॲटॅकचा धोकाही वाढत आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, आहे की हिवाळा जितका जास्त असेल तितका ॲटॅक येण्याचा धोका जास्त असतो. जे लोक लठ्ठपणा, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त आहेत त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. पण असे काही उपाय आहेत ज्याद्वारे तुम्ही या ऋतूमध्येही हृदयविकारापासून स्वतःचा बचाव करू शकता. या ऋतूत हृदयविकाराचा झटका कसा टाळता येईल हे तज्ञांकडून जाणून घेऊया .
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, हिवाळ्याच्या ऋतूमध्ये हृदयविकाराचा धोका खूप जास्त असतो. कारण थंडीमुळे हृदयाच्या शिरा आकुंचन पावतात. आणि हे नीट करण्यासाठी रक्तप्रवाहही खूप वाढतो. अशा परिस्थितीमध्ये रक्तदाब वाढू शकतो. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला छातीत दुखायला लागले असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, पाठ आणि डाव हात दुखणे , पाय सुजणे अशी लक्षणे दिसत असतील तर ते हृदयविकाराचे लक्षण असू शकते. अशी परिस्थिती उद्भवल्यास वेल न घालवता संबंधित व्यक्तीला ताबडतोब रुग्णालयात नेले पाहिजे. .
या 10 मार्गांनी टाळा हार्ट ॲटॅक
– शरीर उबदार ठेवावे, भल्या पहाटे, सकाळी लौकर चालायला जाणे अथवा व्यायाम करणे टाळावे.
– ज्या लोकांना नुकताच कोविडचा संसर्ग झाला आहे, अशा लोकांनी हृदयाच्या सर्व चाचण्या करून घ्याव्यात.
– आहारात फॅट्स आणि कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा
– मीठ खाऊ नका
– सकाळी उठल्यानंतर जास्त पाणी पिणे टाळा
– आहारात सुक्या मेव्याचे सेवन करा
– आहारात फायबरचे प्रमाण जास्त ठेवावे.
– आधीपासून हृदयविकार असेल तर औषधे नियमितपणे घ्यावीत.
– वेळोवेळी नियमितपणे रक्तदाब तपासावा.
– दिवसभरात थोडा वेळ सूर्यप्रकाशात, ऊन्हात बसावे.
कोविडमधून बरे झालेल्या लोकांनी घ्यावी विशेष काळजी
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, कोविडमुळे हृदयाच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होत आहेत, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. गेल्या काही महिन्यांत हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना व्हायरस हे देखील यामागे एक मोठे कारण आहे. म्हणूनच कोविडमधून बरे झालेल्या लोकांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. अशा लोकांनी स्वत:ची लिपिड प्रोफाइल चाचणी, सीटी स्कॅन आणि कोरोनरी अँजिओग्राफी करून घ्यावी. या चाचण्यांच्या मदतीने हृदयाच्या स्थितीची अचूक माहिती मिळेल.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)