Health : गरबा खेळण्याधी या गोष्टी ठेवा लक्षात आणि हृदयविकाराचा टाळा धोका

| Updated on: Oct 22, 2023 | 8:51 PM

Garba : गरबा डान्स करताना स्वतःच्या शरीराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर आता आपण काही अशा गोष्टींबाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे गरबा किंवा दांडिया खेळताना आपलं हृदयविकाराच्या झटक्यापासून संरक्षण होईल.

Health : गरबा खेळण्याधी या गोष्टी ठेवा लक्षात आणि हृदयविकाराचा टाळा धोका
Follow us on

मुंबई : सध्या नवरात्रीचे दिवस सुरू असूव दिवसांमध्ये गरबा, दांडिया मोठ्या उत्साहाने खेळले जातात. लोकं देखील गरबा, दांडिया आवडीने खेळायला दररोज जात असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, गरबा किंवा दांडिया खेळताना आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घेणं देखील गरजेचे आहे. (Heart Attack During Garba Dandiya) कारण जोरात डान्स केल्यानंतर किंवा वेगाने धावताना तुमच्या हृदयाची गती वाढते त्यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. असंच महाराष्ट्रात एक प्रकरण समोर आलं होतं, ज्यामध्ये गरबा करताना एका पस्तीस वर्षाच्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. तर गरबा किंवा डान्स करताना वेगाने करू नये. तसेच मादक पदार्थांचे जर तुम्ही सेवन केले असेल तर त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे

मादक पदार्थांचं सेवन करु नका – जर तुम्ही गरबा किंवा दांडिया खेळायला जात असाल तर मादक पदार्थांचे सेवन करू नका. दारू, सिगरेट अशा मादक पदार्थांचे सेवन केल्यामुळे तुमच्या हृदयावर ताण पडतो त्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे मादक पदार्थांचे सेवन करू नका.

व्यायाम करा – आपल्या शरीरासाठी नियमित व्यायाम करणं खूप गरजेचं असतं. व्यायाम केल्यामुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते. तसेच शारीरिक तंदुरुस्ती देखील महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. जर तुम्हाला हृदय विकाराच्या झटक्यापासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर रोज नियमित व्यायाम करा.

पाणी भरपूर प्या – आपले शरीर निरोगी ठेवायचे असेल तर पाणी पिणे खूप गरजेचे असते. तर सध्या नवरात्रीचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे बहुतेक लोक उपवास करतात. तर या उपवासाच्या दिवसांमध्ये जर तुम्ही पाणी कमी पिले तर तुमच्या हृदयावर ताण येऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे गरबा खेळण्यापूर्वी पाणी त्या आणि त्यानंतर काही वेळाने गरबा खेळायला जा.