नवी दिल्ली : मार्च महिना सुरू होताच देशाच्या काही भागात अचानक तापमानात (rise in temperature) वाढ होते. काही काळ सातत्याने वाढत असलेले तापमान पाहता यावेळी कडक ऊन पडणार असल्याचे म्हटले जात आहे. उन्हाच्या झळा (heat) वाढतच चालल्या आहेत. अशा परिस्थितीत, उष्णतेपासून लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उष्माघातासंदर्भात ॲडव्हायजरी जारी केली आहे. या ॲडव्हायजरी अंतर्गत आरोग्य मंत्रालयाने अति उष्णतेचा प्रभाव (heatwave) टाळण्यासाठी काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. उष्णतेची लाट टाळण्यासाठी काही प्रभावी उपायांबद्दल जाणून घेऊया.
शरीर हायड्रेटेड ठेवावे
पुरेसे पाणी न प्यायल्याने उन्हाळ्यात अनेकदा डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. यामुळे व्यक्ती अनेक आजारांना बळी पडते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला उष्णतेपासून वाचायचे असेल, तर स्वतःला पूर्णपणे हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे. यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे, दिवसभरात कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन करा. याशिवाय लिंबू पाणी, लस्सी यांसारखी पेये प्या. गरज पडल्यास ORSचेही सेवन करू शकता.
उन्हात जाऊ नका
उन्हाळ्यात होणार्या आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी उच्च प्रथिनेयुक्त अन्न खाणे टाळणे आवश्यक आहे. तसेच दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत उन्हात बाहेर पडू नये. ते ऊन अतिशय घातक असते. याशिवाय पातळ, सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे घाला.
चहा, कॉफीचे सेवन करा बंद
हीटवेव्ह किंवा उष्णतेची लाट टाळण्यासाठी, त्यापासून बचाव करण्यासाठी अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये किंवा उच्च साखर असलेली पेयं पिणे टाळावे. त्याशिवाय उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ आणि शिळे अन्न खाणे टाळावे.
मसालेदार अन्न टाळा
उष्णतेची लाट टाळण्यासाठी, मसालेदार अन्नापासून दूर रहावे. तसेच, या हंगामात अधिकाधिक वनस्पती-आधारित आहार म्हणजेच प्लांट-बेस्ड डाएट सेवन करण्याचा प्रयत्न करा. आपल्या आहारात ताजी फळे आणि भाज्या यांच्या रसांचा समावेश करा. यासोबतच सूर्याभिमुख बाजूचे दरवाजे आणि खिडक्या दिवसा बंद ठेवाव्यात, ज्यामुळे जास्त ऊन येणार नाही. हे दरवाजे व खिडक्या, रात्री उघडावेत जेणेकरून ताजी हवा आत येऊ शकेल.
मांसाहारापासून अंतर ठेवा
उन्हाळ्यात सुरक्षित राहण्यासाठी मांसाहार कमी करा. वास्तविक, असे अन्न पचण्यास बराच वेळ लागतो, ज्यामुळे शरीरात निर्जलीकरण होऊ शकते. अन्न पचण्यास उशीर झाल्यामुळे शरीरातील उष्णता वाढते, ज्यामुळे निर्जलीकरण होते.