मुंबईः उच्च रक्तदाबाला हायपर टेन्शन (Hypertension) असं देखील म्हणतात, सध्याच्या जगात अनेक जण या समस्येमुळे लोक त्रस्त आहेत. या समस्यावर वेळीच नियंत्रण ठेवले गेले नाही तर उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात किंवा हृदयाशी संबंधित दुसऱ्या कोणत्याही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने रक्तदाब नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. ही समस्या अनेक नागरिकांना असल्यानेच आणि त्याबाबत जागरूकता निर्माण करावी म्हणून दरवर्षी 17 मे रोजी जागतिक उच्च रक्तदाब दिन (World Hypertension Day) साजरा केला जातो.
उच्च रक्तदाबाचा (High Blood Pressure) त्रास अनेकांना होत असल्यानेच नागरिकांनी निरोगी जीवनशैली आणि निरोगी आहाराचे पालन करणे महत्वाचे आहे. अनेक वेळा जास्त तळलेले, जास्त गोड आणि इतर अनेक आरोग्याला हानीकारक असलेले पदार्थ खाल्ल्याने देखील ही समस्या भेडसावते.
कोणत्याही व्यक्तीचा उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल तर आहारात सकस पदार्थांचा समावेश करा, या काळात कोणते पदार्थ टाळावे तेही जाणून घ्या, आम्ही तुम्हालाचा त्याविषयी माहिती देत आहोत.
जे पदार्थ जास्त काळ टिकवून ठेवता येतात त्यामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. कारण मीठ अन्न पदार्थ जास्त काळ टिकवून ठेवते. पण हे पदार्थ जास्त वेळ ठेवल्याने त्यामध्ये सोडियमचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे अशा स्थितीत उच्च रक्तदाब आणि हृदयविकार अशी समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
अनेक व्यक्तींना नाश्त्यामध्ये ब्रेडसोबत बटर खायला आवडत असते. पिठापासून बनवलेल्या ब्रेड असला तरी तो आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो. त्यामु ब्रेडच्या सततच्या सेवनामुळे वजन तर वाढतेच पण शुगरही वाढते. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्या ही उद्भवतेच.
कोणत्याही मासावर ज्यावेळी प्रक्रिया केली जाते त्यावेळी त्यामध्ये सोडियम मोठ्या प्रमाणात वापरले जाते. सँडविचसाठी सॉस, लोणचे यासाठीही ते वापरले जाते. त्यामुळे शरीरातील सोडियमची पातळी निश्चितच वाढते. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते.
कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असल्याने त्यामुळे रक्तदाब वाढतो. कॅफिन आणि साखर रक्तदाब वाढवण्याचे काम करतात. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
मिठाई आणि इतर स्नॅक्समध्ये साखरेचे प्रमाण मोठ्या असते. या अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात आवश्यकतेपेक्षा जास्त साखर वापरते. त्याचा दुष्परिणाम म्हणजे हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे रक्तदाब वाढतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येला सामोरे जावे लागते.