High Cholesterol Symptoms: आपल्याला कोणताही आजार झाला तर त्याची लक्षणे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर दिसायला लागतात. त्याचप्रमाणे शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Level) वाढल्यास त्याचीही अनेक लक्षणे वा चिन्हे दिसू लागतात. ती चिन्हे कोणती, याबद्दल माहिती असल्यास त्यावर त्वरित योग्य उपचार करता येतात आणि आरोग्यासंबंधी गंभीर धोका टळतो. हाय कोलेस्ट्ऱॉलमुळे हृदयविकाराचा (Heart Disease)धोका वाढतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माहितीनुसार, शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी प्रमाणापेक्षा अधिक वाढल्यास हृदयासंबंधित विकार आणि स्ट्रोकचा (Stroke) धोका जास्त वाढतो. चांगले एचडीएल (Good)आणि घातक एलडीएल (Bad)असे कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात. गुड कोलेस्ट्रॉल म्हणजेच हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (HDL) आणि लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल , असे त्याचे वर्गीकरण होते. LDL म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल हे शरीरासाठी घातक असते. ते वाढल्यास शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कोलेस्ट्रॉलची पातळी प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये फॅट (चरबी) जमा होऊ शकते. जसजसे फॅटचे प्रमाण वाढते, तसा रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो. जाणून घेऊया, वाढत्या कोलेस्ट्रॉलची कोणती चिन्हे (Warning Signs) आहेत, ज्याकडे वेळीच लक्ष देऊन सावधान राहणे गरजेचे आहे. खालीलपैकी कोणतीही लक्षणे तुमच्या शरीरावर दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी प्रमाणापेक्षा अधिक वाढल्यास आपल्या पायांवर परिणाम होतो. पायांमधील संवेदना कमी होऊन ते बधीर वा सुन्न झाल्यासारखे वाटते. पायांची कोणतीही हालचाल होत नाही, त्याशिवाय कधीकधी पायात तीव्र वेदना होतात तसेच बऱ्याच वेळेस पाय थंड पडल्यासारखे होते.
शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी प्रमाणापेक्षा अधिक वाढल्याचे आणखी एक चिन्ह म्हणजे पायात होणाऱ्या वेदना. लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल हे शरीरासाठी घातक असते. ते वाढल्यास शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्याची पातळी प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये फॅट (चरबी) जमा होऊ शकते. जसजसे फॅटचे प्रमाण वाढते, तसा रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि पायांच्या नसांपर्यंत रक्तप्रवाह नीट होत नाही, तसेच ऑक्सीजनही पोहोचत नाही. त्यामुळे पायात तीव्र वेदना होतात.
वाढत्या कोलेस्ट्रॉलचा परिणाम नखांवरही दिसून येतो. वर नमूद केल्याप्रमाणे, कोलेस्ट्रॉलची पातळी प्रमाणापेक्षा अधिक वाढली असेल तर रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि शरीराच्या सर्व भागांत रक्त नीट पोहोचत नाही. त्याचा परिणाम नखांवरही दिसून येतो. त्यामुळे नखांच्या आता सुरकुत्या पडू लागतात. तसेच नखं, पिवळी, पातळ आणि कधी-कधी चॉकलेटी रंगाची दिसू लागतात.
वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे शरीराचे नुकसान होऊ द्यायचे नसेल, तर काही गोष्टींची काळजी घेऊन कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्यास आळा घातला पाहिजे.
– धूम्रपानाची सवय ही शरीरासाठी अत्यंत धोकाहायक आहे. त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात आणि स्ट्रोकचा (Stroke) धोकाही वाढतो. त्यामुळे धूम्रपान बिलकुल करू नये. त्याने शरीराला कोणताही फायदा होत नाही, उलट शरीराचे अपरिमित नुकसानच होते.
– ज्या पदार्थांमध्ये नैसर्गिक रित्या फॅटचे ( चरबी) प्रमाण कमी आहे, अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा.
– सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण ज्यामध्ये खूप जास्त आहे, अशा पदार्थांचे सेवन करणे टाळावे.
– रोज थोडा वेळ तरी व्यायाम करावा. सकाळी अथवा संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, चालायला जावे.