High Cholesterol: वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे होऊ शकते हृदयाशी संबंधित हे तीन आजार, ‘हे’ उपाय ठरतील फायदेशीर

| Updated on: Dec 02, 2022 | 3:31 PM

वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाशी संबंधित अनेक समस्या उध्दभवतात. या समस्येचे मूळ आपल्या जीवनशैलीत आहे.

High Cholesterol: वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे होऊ शकते हृदयाशी संबंधित हे तीन आजार, हे उपाय ठरतील फायदेशीर
हृदय विकार
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई,  गेल्या काही दिवसांपासून देशात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये (Heart Diseases) वाढ होत आहे. आता लोकांना कमी वयात हृदयविकार होऊ लागला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) अनेक घटनांमध्ये जागीच मृत्यू होत आहे. हृदयविकाराची अनेक कारणे आहेत. खराब कोलेस्टेरॉल (Bad Cholesterol) वाढणे हे देखील याचे एक मोठे कारण आहे. यामुळे अनेक प्रकरणांमध्ये हृदयविकाराचा झटकाही येतो. कोलेस्टेरॉलमुळे हृदयाला कसे नुकसान होते ते जाणून घेऊया.

वरिष्ठ फिजिशियन डॉ.कवलजीत सिंग यांच्या मते कोलेस्टेरॉल हा एक प्रकारचा फॅट आहे. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी योग्य असणे महत्त्वाचे आहे. शरीरात त्याचे प्रमाण जास्त वाढू लागले तर हृदयाशी संबंधित समस्या सुरू होतात. खराब कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे रक्ताच्या धमन्यांमध्ये घाण साचते. त्यामुळे रक्त आणि ऑक्सिजन शरीरात पोहोचत नाही. परिणामी हृदयाची कार्यक्षमता कमी होते. ज्यामुळे नंतर हृदयविकाराचा झटका येतो.

कोलेस्टेरॉल हे वाईट आणि चांगले दोन्ही प्रहारचे आहेत. ज्याला एचडीएल आणि एलडीएल म्हणतात. यामध्ये चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी 60 पेक्षा जास्त आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी  120 पेक्षा कमी असावी.  शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी सामान्य असणे खूप महत्वाचे आहे. परंतु जर ते वाढले तर ते हृदयाच्या धमन्यांभोवती कोलेस्ट्रॉल साठण्यास सुरवात होते, ज्यामुळे अनेक वेळा प्लेक तयार होण्याचा धोका असतो. ही स्थिती एथेरोस्क्लेरोसिसचे रूप घेते.

हे सुद्धा वाचा

अनेक प्रकरणांमध्ये लक्षणे दिसत नाहीत

शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढल्याची लक्षणे सहज लक्षात येत नाहीत आणि अचानक हृदयविकाराचा झटका येतो, असे डॉ.सिंग म्हणाले. अशा परिस्थितीत, दर 6 महिन्यांतून एकदा तरी लिपिर प्रोफाइल चाचणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे योग्य प्रमाण कळते. अशा परिस्थितीत वेळीच बचाव करता येतो.

 

खराब कोलेस्ट्रॉलमुळे होतात हे तीन रोग

अनेक प्रकरणांमध्ये, खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे, अनेक प्रकारचे रोग उद्भवतात. त्यापैकी तीन मुख्य आहेत.

परिधीय धमनी रोग

कॅरोटीड धमनी रोग

हृद्य रक्तवाहिन्यांचा विकार

 

या उपायांनी मिळेल आराम

जीवनशैलीला शिस्त लावा.  झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा 

वजन नियंत्रणात ठेवा आणि अन्नातील कार्ब्स आणि फॅट्सचे प्रमाण कमी करा

धूम्रपान आणि मद्यपानाला नाही म्हणा 

दररोज व्यायाम करा

जर तुम्ही डेस्कवर काम करत असाल तर कामाच्या दरम्यान ब्रेक घ्या.