Health : शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं योग्य प्रमाण किती? जास्त असेल तर आरोग्यासाठी हानिकारक!

| Updated on: Jul 15, 2023 | 11:33 PM

काही लोकांच्या शरीरात जास्त हिमोग्लोबीन असते. मात्र, जास्त हिमोग्लोबीन असणाऱ्या लोकांनाही अनेक वेगवेगळ्या आजारांचा धोका असतो. तर आपण हिमोग्लोबीन वाढल्यानंतर काय समस्या निर्माण होतात याबाबत जाणून घेणार आहोत.

Health : शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं योग्य प्रमाण किती? जास्त असेल तर आरोग्यासाठी हानिकारक!
Follow us on

मुंबई : प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी तसेच निरोगी राहण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात हिमोग्लोबीन असणं गरजेचं असतं. पण बहुतेक लोकांच्या शरीरात हिमोग्लोबीन कमी असते, त्यामुळे ते लोक अनेक आजारांना बळी पडतात. पण काही लोकांच्या शरीरात जास्त हिमोग्लोबीन असते. मात्र, जास्त हिमोग्लोबीन असणाऱ्या लोकांनाही अनेक वेगवेगळ्या आजारांचा धोका असतो. तर आपण हिमोग्लोबीन वाढल्यानंतर काय समस्या निर्माण होतात याबाबत जाणून घेणार आहोत.

हिमोग्लोबीनद्वारे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात ऑक्सिजन पोहोचवला जातो. तसंच प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण वेगवेगळे असते. ज्या लोकांच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढले असेल तर त्याला हिमोक्रोमॅटोसिस असे म्हणतात.

पुरूषांमध्ये 15 ते 16 प्रति डेसीलिटर एवढे हिमोग्लोबीनचे प्रमाण असणे गरजेचे असते. तर स्त्रियांमध्ये 14 ते 15 एवढे हिमोग्लोबीन असणं आवश्यक असतं. जर पुरूष आणि स्त्रियांमध्ये यापेक्षा जास्त किंवा कमी हिमोग्लोबीन असेल तर ते शरीरासाठी घातक ठरते.

शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण जास्त असेल तर तुमच्या नाकातून आणि आतड्यांमधून रक्तस्त्राव होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. सोबतच तुमच्या हिरड्यांमधून देखील रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.

जर तुमच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण जास्त असेल तर त्याचा तुमच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो. यामुळे आपला मेंदू नीट काम करत नाही आणि आपली विचार करण्याची क्षमता कमी होते. तुम्हाला काही गोष्टी लवकर समजत नाही आणि तुम्ही गोंधळून जाऊ शकता.

तसेच जास्त हिमोग्लोबिन असलेल्या लोकांना वारंवार थकवा जाणू शकतो. त्यामुळे अशा लोकांना कोणताही काम करताना किंवा चालताना लवकर थकवा निर्माण होतो.