Beauty Tips : फाटलेल्या दुधाने चमकेल त्वचा, ‘या’ पद्धतीने बनवा सीरम

| Updated on: Jul 20, 2023 | 11:01 PM

जर तुम्हाला फ्रेश, क्लीअर, ग्लोविंग स्किन हवी असेल तर यासाठी तुम्हाला दुधापासून फेस सीरम बनवावे लागेल. हे सीरम बनवण्यासाठी एक कप दूध, अर्धा लिंबू, हळद, ग्लिसरीन आणि मीठ इत्यादी गोष्टी लागतात.

Beauty Tips : फाटलेल्या दुधाने चमकेल त्वचा, या पद्धतीने बनवा सीरम
Skin beautiful monsoon tips
Follow us on

मुंबई : प्रत्येक स्त्रिला आपण सुंदर दिसाव असं वाटतंच, यासाठी स्त्रिया त्यांच्या स्किनची काळजी घेताना दिसतात. त्यात आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. या दिवसांमध्ये कधी गार तर कधी दमट वातावरण असते. त्यामुळे आपली स्किन ऑइली होते तर कधी ड्राय पडते. यासाठी स्त्रिया त्यांच्या स्किनची काळजी घेण्यासाठी अनेक वेगवेगळे स्किन प्रोडक्ट वापरताना दिसतात. पण या प्रोडक्ट्स सोबतच तुम्ही काही घरगुती उपाय करूनही तुमची स्किन फ्रेश आणि टवटवीत ठेवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त दुधाचा वापर करायचा आहे. आता तो कसा याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

जर तुम्हाला फ्रेश, क्लीअर, ग्लोविंग स्किन हवी असेल तर यासाठी तुम्हाला दुधापासून फेस सीरम बनवावे लागेल. हे सीरम बनवण्यासाठी एक कप दूध, अर्धा लिंबू, हळद, ग्लिसरीन आणि मीठ इत्यादी गोष्टी लागतात.

आता आपण हे सीरम बनवायचं कसं याबाबत जाणून घेणार आहोत. हे फेस सीरम बनवण्यासाठी एका पातेल्यात दूध गरम करायला ठेवावे. त्या दुधाला उकळी आल्यानंतर त्यात लिंबाचा रस मिक्स करावा, यामुळे दूध फाटेल. मग हे दूध गाळून त्यातील दुधाचे पाणी काढून घ्यावे. या पाण्यात हळद, ग्लिसरीन आणि मीठ घालून हे सर्व मिक्स करावे. अशाप्रकारे हे फेस सीरम तयार आहे. हे सीरम एका बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा.

‘या’ सीरमचा वापर कसा करावा?

हे सीरम वापरताना सगळ्यात आधी तुमचा चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर या सीरमचे काही ड्रॉप्स घ्या आणि त्याने चेहर्‍याला मसाज करा. ते सीरम त्वचेत चांगले शोषले जाईल तोपर्यंत हलक्या हातांनी मसाज करा. मग तुमची स्किन फ्रेश आणि चमकदार दिसेल. कारण या सीरममधील दुधाचे पाणी स्किन हायड्रेट करते. तर हळद, ग्लिसरीन हे आपली त्वचा उजळ बनवते. त्यामुळे तुम्हाला जर ग्लोविंग स्किन हवी असेल तर या फेस सीरमचा वापर नक्की करा.