नवी दिल्ली : मध केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप (skin) फायदेशीर आहे. त्वचेसाठी तुम्ही मध (honey) अनेक प्रकारे वापरू शकता. मुरुमं, डाग आणि त्वचेशी संबंधित इतर अनेक समस्यांपासून मुक्त (skin problems) होण्यास मध मदत करतो. त्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट गुणधर्म, अमीनो ॲसिड आणि इतर अनेक पोषक घटक असतात. हे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. ते स्किन एजिंग नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. मधामुळे त्वचा चमकदार होण्यासही मदत होते. यामुळे त्वचा फ्रेश दिसते. आपण त्वचेसाठी मधाचा वापर कोणत्या प्रकारे करू शकता ते जाणून घेऊया.
मधाचा फेसपॅक
अर्धा चमचा मध घ्या. चेहरा आणि मानेवर लावा. याने काही वेळ त्वचेला मसाज करा. 15 ते 20 मिनिटे त्वचेवर राहू द्या. यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदार राहण्यास मदत होईल.
मध व दह्याचा फेसपॅक
एका भांड्यात एक चमचा दही घ्या. त्यात अर्धा चमचा मध घाला. या दोन्ही गोष्टी मिक्स करून चेहरा आणि मानेला लावा. त्या मिश्रणाने काही वेळ त्वचेला मसाज करा. 15 ते 20 मिनिटे त्वचेवर राहू द्या. यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा. तुम्ही ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.
केळं आणि मधाचा फेसपॅक
एक पिकलेले केळे मॅश करा. त्यात 2 ते 3 चमचे मध टाका. या दोन्ही गोष्टी नीट मिसळा आणि चेहरा आणि मानेला लावा. त्याने काही वेळ त्वचेला मसाज करा. 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. याच्या नियमित वापराने चेहरा मऊ व चमकदार होतो.
दूध व मधाचा फेसपॅक
एका भांड्यात 2 ते 3 मोठे चमचे भरून दूध घ्या. त्यात समान प्रमाणात मध घाला. या दोन्ही गोष्टी नीट मिक्स करून चेहरा आणि मानेला लावा. याने काही वेळ त्वचेला मसाज करा. तो 15 ते 20 मिनिटे त्वचेवर राहू द्या. वाळल्यानंतर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. नियमितपणे वापर केल्यानंतर अपेक्षित परिणाम दिसून येईल.