नवी दिल्ली : आरोग्यविषयक पायाभूत सुविधा (हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर) आणि इतर आरोग्यविषयक सोयीसुविधांच्या निकषावर देशातील 8 प्रमुख शहरांचा अभ्यास करण्यात आलाय. यात राजधानी दिल्लीसह पुण्याचाही समावेश होता. या अभ्यासात संबंधित शहरातील रुग्णालयातील बेड, हवा, पाण्याची गुणवत्ता, स्वच्छता या निकषांवर पाहणी करण्यात आली. या अभ्यास अहवालात पुण्याने पहिला क्रमांक पटकावला आहे, तर दिल्ली-एनसीआर सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे. Housing.com ने हा अभ्यास करुन अहवाल प्रकाशित केलाय (Housing dot com health infrastructure survey of 8 cities including Pune Mumbai in India).
अभ्यास करणारं Housing.com हे रियल एस्टेट पोर्टल आहे. त्याच्यावर अमेरिकेची वृत्तकंपनी न्यूज कॉर्पची मालकी आहे. या कंपनीचीच ऑस्ट्रेलियन ग्रुप फर्म REA आहे. बुधवारी ‘स्टेट ऑफ हेल्थकेयर इन इंडिया’ नावाने त्यांनी अहवाल प्रकाशित केला. यात देशातील 8 प्रमुख शहरांचा सर्वे करण्यात आला. यात अहमदाबाद, बंगळुरु, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, कोलकाता, मुंबई मेट्रोपोलिटन रीजन (MMR) आणि पुणे शहराचा समावेश आहे.
सर्वेत आरोग्य विषयक सेवेंची वेगवेगळ्या निकषांवर पाहणी करण्यात आली. यात प्रत्येकी 1 हजार लोकांमागे किती रुग्णालयं, बेड आहेत, तेथील हवा, पाण्याची गुणवत्ता कशी आहे, स्वच्छता आणि राहण्यायोग्य स्थिती कशी आहे या घटकांचा विचार करण्यात आला. या अभ्यास अहवालात 40 टक्के प्राधान्य हॉस्पिटल बेडच्या संख्येला देण्यात आलं होतं. कोरोना काळात अनेक ठिकाणी रुग्णालयं आणि बेडची कमतरता जाणवत आहे. त्यामुळेच या निकषाला अधिक महत्व देण्यात आलं.
सर्वेच्या अभ्यासानुसार, हेल्थ इंफ्रास्ट्रक्चरचा विचार केला तर देशात पुणे सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे. येथे प्रत्येकी 1 हजार लोकांमागे रुग्णालयात 3.5 बेडची उपलब्धता आहे. भारताच्या सरासरीच्या प्रमाणात हा आकडा खूप चांगला आहे. Housing.com ने ‘PTI’ला दिलेल्या माहितीनुसार, देशात सरकारी आरोग्य यंत्रणेत प्रत्येकी 1000 लोकांच्या मागे उपलब्ध बेडचं प्रमाण केवळ अर्धा बेड आहे. तर खासगीत हे प्रमाण 1.4 बेड इतकं सरासरी आहे.
याशिवाय सर्वेत मुंबई मेट्रोपोलिटन रीजनला चौथा क्रमांक मिळालाय. हैदराबाद पाचव्या क्रमांकावर, चेन्नई सहाव्या आणि कोलकाता सातव्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :