नवी दिल्ली – बऱ्याच लोकांना चहासोबत (tea and snacks) छोटं-मोठं स्नॅक्स खायची सवय असते. काही जण चहासोबत एखादं बिस्कीट खातात, तर काहींना चहामध्ये रस्क / टोस्ट (rusk) बुडवून खायची सवय असते. यामुळे अवेळी लागलेली छोटी भूक भागते. तुम्हीही चहासोबत रस्क खात असाल तर सावध व्हायची गरज आहे. रस्क खाल्याने तुमच्या आरोग्याचे नुकसान (side effects on health) होऊ शकते, कसे ते जाणून घेऊया.
रस्क कसा तयार होतो ?
मैदा, साखर, तेल, प्रिझर्व्हेटिव्ह्ज , फूड कलर यांच्या मिश्रणातून तयार होतो रस्क, ज्यामुळे आपल्या शरीराचे व आरोग्याचे केवळ नुकसान होते. आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, रस्कचे सेवन केल्याने ब्लड शुगरची पातळी वाढते तसेच शरीरातील जळजळ वाढते. दररोज किंवा वारंवार रस्क खाल्याने ग्लूकोजची पातळी असंतुलित होते आणि शरीरातील इन्फ्लामेशन वाढू शकते.
रस्क खाल्याने काय नुकसान होते ?
रस्कचे सेवन केल्याने आपल्या आतड्यांवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे इम्युनिटी आणि हार्मोन्सचे आरोग्य खराब होते, तसेच वजन वाढणे, ताण निर्माण होणे आणि थकवा जाणवणे अशी लक्षणेही दिसून येतात.
हे पदार्थ ठरतात हानिकारक
रस्क किंवा टोस्टमध्ये असलेले हे घटक अतिशय हानिकारक ठरू शकतात.
मैदा : मैदा हे एक पीठ असले तरी ते प्रक्रिया केलेले असते. म्हणजेच त्यामध्ये व्हिटॅमिन्स, खनिज पदार्थ आणि फायबर बिलकुल नसते.
साखरयुक्त : रस्कमुळे आपल्या शरीरातील केवळ कॅलरीज वाढतात. दिवसभरात दोन रस्क खाल्यानेही कॅलरीज खूप वाढतात.
रिफाइन्ड ऑईल : यातील व्हेजिटेबल ऑईल हेही खूप प्रक्रिया केलेल असते, त्यामध्ये कोणतीही पोषक तत्वं नसतात. हे खाल्याने शरीरात केवळ जळजळ होऊ शकते.
रवा : हा गव्हापासून बनलेला असला तरी त्यात कोणतीही पोषक तत्वं किंवा फायबर जराही नसते.
प्रिझर्व्हेटिव्ह, कृत्रिम फ्लेव्हर : या सर्व घटकांमुळे पदार्थांचे आरोग्य तर वाढते, ते दिसतातही छान, पण आपल्या आरोग्याला काहीच फायदा मिलत नाही, केवळ नुकसान होते.
फूड कलर : रस्कला रंग देण्यासाठी त्यात कॅरमल कलर मिसळला जातो, ज्यामुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते.