Skin Health News : आठवड्यातून किती वेळा स्क्रब करणे योग्य? जाणून घ्या!

| Updated on: Oct 14, 2023 | 10:38 PM

स्क्रबिंग किती वेळा केलं पाहिजे याबाबत अनेक लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. कारण स्क्रबिंग  दररोज करणं स्किनसाठी हानिकारक ठरू शकतं. तर आता आपण स्क्रबिंग आठवड्यातून किती वेळा केले पाहिजे याबाबत जाणून घेणार आहोत.

Skin Health News : आठवड्यातून किती वेळा स्क्रब करणे योग्य? जाणून घ्या!
Follow us on

मुंबई : आज-काल बहुतेक लोक त्यांच्या चेहऱ्याला आणि बॉडीला स्क्रबिंग करताना दिसतात. यामध्ये फक्त महिलाच नाही तर पुरुष देखील स्किन केअर साठी स्क्रबिंग करत असतात. वाढतं प्रदूषण, सन टॅनिंग अशा गोष्टींमुळे आपली स्किन टॅन होऊन जाते. तसेच ब्लॅकहेडची समस्या देखील अनेकांना सतावत असते. अशावेळी लोक स्क्रबिंग करताना दिसतात. स्क्रबिंग केल्यामुळे स्किन टॅनिंग, ब्लॅक हेड्स दूर होण्यास मदत होते आणि स्किन उजळते. त्यामुळे स्क्रबिंग करणे खूप गरजेचं असतं.

बहुतेक लोकांची स्किन सेन्सिटिव्ह असते. तर ज्या लोकांची स्किन सेन्सिटिव्ह असेल अशा लोकांनी स्क्रबिंग जास्त प्रमाणात करू नये. नाहीतर त्यांच्या स्किनसाठी हानिकारक ठरू शकते. ज्या लोकांची स्किन सेन्सिटिव्ह आहे अशा लोकांनी आठवड्यातून एकदाच स्क्रबिंग करणे गरजेचे आहे. त्यांनी जर जास्त वेळा स्क्रबिंग केलं तर त्यांच्या स्क्रीनवर रॅशेस पडणे किंवा स्किन लाल होणे अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

ज्या लोकांची नॉर्मल स्किन असते असे लोक आठवड्यातून दोन ते तीन वेळा स्क्रबिंग करू शकतात. नॉर्मल स्किन असलेल्या लोकांना ब्लॅकहेडची समस्या असते तर अशा लोकांनी आठवड्यातून दोन ते तीन वेळा स्क्रबिंग करणे गरजेचे आहे. तर ज्या लोकांची स्किन ओईली असते अशांना ब्लॅकहेड्सची समस्या मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे असे लोक दररोज स्क्रबिंग करू शकतात.

तर स्क्रबिंग हे तुम्ही तुमच्या स्किननुसार केलं पाहिजे. वर पाहिल्याप्रमाणे ज्या लोकांची नॉर्मल स्किन आहे अशांनी आठवड्यातून दोन तीन वेळा स्क्रबिंग करणे गरजेचे असतं. तर ज्या लोकांची सेन्सिटिव्ह स्किन आहे अशा लोकांनी आठवड्यातून एकदाच स्क्रबिंग करणं गरजेच आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्किन टाईप नुसार स्क्रबिंग करण्याचा कालावधी ठरवू शकता.

जेव्हा तुम्ही स्क्रबिंग करता त्याच्यानंतर चेहऱ्याला आणि तुमच्या बॉडीला मॉइस्चराइज लावायला विसरू नका. मॉइस्चराइज आपल्या ओपन पोर्स पर्यंत जाते त्यामुळे आपली स्किन मॉइस्चराइज होते आणि स्किन उजळण्यास देखील मदत होते. त्यामुळे स्क्रबिंग नंतर मॉइश्चरायझर लावणं फायदेशीर ठरतं.