आपण आपल्या आहाराबाबत आता अधिकच जागरुक झालो आहोत. पूर्वी आपण जाड मीठ वाण्याकडून आणायचो, त्याच्या शुद्धतेने आपल्याला काही फरक पडायचा नाही. अजूनही ग्रामीण भागात किंवा आदिवासी भागात असे मीठ वापरले जाते. परंतू त्यानंतर आले टाटाचे शुद्ध मीठ…त्यानंतर पुन्हा मीठात आयोडीन आहे का अशी जाहिरात सुरु झाली. आता तर रक्तदाब आणि मधुमेह असणाऱ्यांना कमी सोडियमचे मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. हे कमी सोडियमचे मीठ म्हणजे नक्की काय ? पाहूयात… आपण जे बाजारातून मीठ आणतो त्यात सोडियमचे प्रमाण जास्त असते. म्हणजे त्यात ४० टक्क्यांपर्यंत मीठ असते. आता या मीठातील सोडियमचे प्रमाण करुन त्याला खाण्यायोग्य बनवले जात आहे.आता बाजारात तर अनेक ब्रँडचे मीठ आले असून ज्यात सोडियमचे प्रमाण कमी आहे.जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की नेहमीच्या मीठा पेक्षा सोडियमवाले मीठ खाणे गरजेचे आहे.सोडियम मीठाच्या बदल्यात आता LSSS ( एलएसएसएस ) चा वापर करण्याचा विचार करायला हवा आहे. LSSS ( एलएसएसएस ) मीठात सोडियम क्लोराईड एक निश्चित टक्के दुसऱ्या खनिज...