मुंबई : सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू झाले असून या दिवसांमध्ये बहुतेक लोक पाण्याचे सेवन कमी प्रमाणात करतात. तसेच हिवाळ्यात जास्त तहानही लागत नाही त्याच्यामुळे लोक पाणी जास्त पीत नाहीत. पण शरीरामध्ये पुरेसं पाणी असणं खूप गरजेचे आहे. त्यामुळे पाणी पिणे खूप आवश्यक आहे. पण हिवाळ्यात लोक जास्त पाणी पीत नाहीत त्यामुळे त्यांना अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हिवाळ्यामध्ये सर्वांना कोरड्या त्वचेचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतो.
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पिणे खूप गरजेचे आहे. यामुळे आपले शरीर निरोगी राहते तसेच आपल्याला फ्रेश राहण्यास मदत होते. त्यामुळे दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पिणे खूप गरजेचे आहे. पण बहुतेक यापेक्षा जास्त पाणी देखील पितात. पण प्रत्येकाची शरीराची रचना वेगवेगळी असते, त्यामुळे तुम्ही पाणी पिताना किती ग्लास पाणी प्यायला हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार पाणी प्या. योग्य प्रमाणात पाणी पिणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते.
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी तीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच आपल्या शरीरातील पाण्याची गरज आपले वय, शारीरिक हालचाली, गर्भधारणा यानुसार बदलत असते. त्यामुळे आपल्या शरीराच्या रचनेनुसार पाणी पिणे गरजेचे आहे. तसेच आपल्या शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्याला गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पाणी पिणे खूप गरजेचे आहे. तसेच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही गार पाण्यापेक्षा कोमट पाणी पिले तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर आपले शरीर कमजोर होते. आपण पाणी कमी पिले तर त्याच्या आपल्या शरीराच्या कार्यावर परिणाम होतो. तसेच आपल्या शरीराला योग्य प्रकारे ऑक्सिजन मिळत नाही, डिहायड्रेशन, थकवा किडनीवर परिणाम होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे जास्त पाणी खूप गरजेचे आहे.
पाणी पिताना कधीही उभं राहून पिऊ नये. तसंच तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं असेल की मॅरेथॉन मधील धावपटू धावत असताना पाणी पितात. याबाबत तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, ते धावताना पाणी पीत असले तरी ते मोकळेपणाने पितात. त्यामुळे पाणी पिताना ते मोकळेपणाने प्या, घाईघाईने पिऊ नका.