Health Benefits: निरोगी आरोग्यासाठी नेमकं किती ग्लास पाणी प्यावे? जाणून घ्या फायदे

| Updated on: Jan 15, 2025 | 1:27 PM

Water Benefits: निरोगी आरोग्यासाठी शरीरामध्ये नियमित पाण्याचे सेवन करणे गरजेचे असते. पाणी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि तुमचं शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतो. चला तर जाणून घेऊया वयानुसार प्रत्येक व्यक्तीने किती पाणी प्यावे?

Health Benefits: निरोगी आरोग्यासाठी नेमकं किती ग्लास पाणी प्यावे? जाणून घ्या फायदे
Follow us on

सुखी आणि निरोगी आयुष्यासाठी अन्न, पाणी, निवारा या मणूष्याचा आवश्यक गरजा असतात. निरोगी आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात. माणसाला जगण्यासाठी अन्न नसेल तरीही चालेल परंतु, जर पाणी नसेल तर आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. पाणी पिऊन माणूस २१ दिवस जिवंत राहू शकतो. पाणी आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे असते. दिवसभरात ७ ते ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे असते. पाणी प्यायल्यामुळे तुमचं शरीर हायड्रेट राहाते.

पाण्याचे नियमित सेवन केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. शिवाय नियमित पाणी प्यायल्यामुळे आरोग्यासंबंधीत समस्या दूर राहाण्यास मदत करतात. पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ निधून जाण्यास मदत होते. शरीरमधील विषारी पदार्थ निघून गेल्यावर तुमच्या शरीरात सकारात्मक बदल होतात. तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाल्यास तुम्हाला आरोग्या संबंधीत अनेक समस्या होऊ शकतात. त्यामुळे नियमित आणि भरपूर पाणी प्यायल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. एखाद्या मानवी शरीरामध्ये ६० ते ७० टक्के पाणी असते. पाण्याच्या नियमित आणि योग्य प्रमाणात सेवनामुळे तुमचं शरीर निरोगी राहाण्यास मदत होते.

शरीरातील प्रत्येक आवयव निरोगी राहाण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. शरीरात असलेले पाणी तुमच्या आवयवांचे रक्षण करण्यास मदत करतात. याशिवाय पाण्याचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जातो. जेवण बनवण्यासाठी, घरातील इतर कामं कामं करण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. प्रत्येक व्यक्तीच्या वयानुसार शरीराला पाण्याची वेदवेगळी गरज असते. चला तर जाणून घेऊया दिवसभरात वयानुसार किती ग्लास पाणी प्यावे?

हे सुद्धा वाचा

१ ते ३ वर्षाच्या मुलांनी किती पाण्याचे सेवन करावे?

१ ते ३ वर्षांच्या वयोगटातील मुलांनी दिवसभरामध्ये नियमित ४ ते ५ कप पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी प्यायल्यामुळे लहान मुलांचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. नियमित पाणी प्यायल्यामुळे मुलांच्या शरीरामध्ये पोषण मिळण्यास मदत होते. लहान मुलांनी किमान ८०० ते १००० मिली पाणी पिणे आवश्यक आहे.

४ ते ८ वर्षाच्या मुलांनी किती पाण्याचे सेवन करावे?

४ ते ८ वर्षांच्या वयोगटातील मुलांनी दिवसभरामध्ये १२०० मिली किंवा ५ ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. शिवाय तुमच्या मुलांच्या आहारामध्ये पातळ पदार्थ, ज्यूस इत्यदी गोष्टींचा समावेश केल्यामुळे तुमच्या शरीराला निरोगी पोषण मिळते.

९ ते १३ वर्षाच्या मुलांनी किती पाण्याचे सेवन करावे?

९ ते १३ वर्षाच्या मुलांनी दिवसभरामध्ये नियमित ७ ते ८ ग्लास पाणी प्यावे. यामुळे तुमच्या मुलांचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. शिवाय मुलांनी १६०० ते १९०० मिली पाण्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या मुलांची नियमित वाढ होते.

१४ ते १८ वर्षाच्या मुलांनी किती पाण्याचे सेवन करावे?

निरोगी आरोग्य जगण्यासाठी आणि तुमच्या शरीराची नियमित वाढ होण्यासाठी १४ ते १८ वर्षांच्या मुलांनी दिवसभरात ८ ते ११ कप पाणी पिणं गरजेचे असते. तसेच या वयागटातील मुलांनी १९०० ते २६०० मिली पाणी पिणं गरजेचे असते.

१९ ते ६४ वयोगटाच्या व्यक्तींनी नियमित किती पाणी प्यावे?

१९ ते ६४ वयोगटाच्या व्यक्तींनी दिवसभरात ८ ते ११ ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. या वयोगटातील व्यक्तींनी जास्त प्रमाणात पाणी पिणं आवश्यक आहे. याशिवाय पाण्याचे नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. नियमित पाण्याचे सेवन केल्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.