मोबाईलच्या वेडापायी मुलांचं वागणं होतंय धोकादायक , अशी सोडवा सवय

| Updated on: Dec 28, 2022 | 12:15 PM

आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देऊन स्वत:च्या जगात मग्न होणाऱ्या आई-वडिलांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. मोबाईलचा हा अतिवापर मुलांसाठी अतिशय घातक ठरत असून त्यांना त्याचे व्यसन लागत आहे. त्यांच्या झोपेवर परिणाम होण्यापासून ते अनेक दुष्परिणाम होताना दिसत आहेत.

मोबाईलच्या वेडापायी मुलांचं वागणं होतंय धोकादायक , अशी सोडवा सवय
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्लीमोबाईल वापराचे वाढते व्यसन किंवा ॲडिक्शन (mobile addiction) ही आजच्या काळातील मोठी समस्या बनली आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये संपूर्ण शिक्षण व्यवस्था ऑनलाइन (online education) मोडवर असताना, त्याच काळात मुलांच्या हातातही मोबाईल पडल्याने त्यांना मोबाईनलच्या वापराची घातक (bad habit) सवय लागली आहे.

मोबाईलवर गेम खेळणे, तासनतास काही ना काही शोधत अथवा (कंटेट) बघत राहणे किंवा मोबाईलवर सतत वेळ घालवणे यामुळे मुलांची भूक, झोप, अभ्यास, संवाद क्षमता, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज हे सगळं कमी झालं आहे. शास्त्रज्ञांच्या सांगण्यानुसार, मोबाईलचे व्यसन मुलांना मानसिक दृष्ट्याही त्रस्त करत आहे.

आजकालचे मोबाईल फोन हे खूप ॲडव्हान्स झाले आहेत. अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचले आहे. फोनचे हे जग इते आकर्षक आहे की केवळ लहान मुलंच नव्हे तर मोठ्यांनाही त्याचे वेड लागलेले दिसते, असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे मोबाईलचा किती वेळ वापर करतोय किंवा किती वेळ वापर केला पाहिजे, हे कोणच्याच लक्षात येत नाही. त्याचा सामान्य (एक ठराविक वेळ) वापर करणे हाच पर्याय ठरू शकतो.

हे सुद्धा वाचा

मुलांमधील मोबाईलचे वेड कमी करण्यासाठी पालकांनी या टिप्स फॉलो कराव्यात –

1) 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मोबाईल वापरण्यासाठी एक निश्चित वेळ आखून द्यावी.

2) लहान मुलं व किशोरवयीन मुलं यांना सांगून त्यांच्या फोनवर पॅरेंटल कंट्रोल ॲपचा वापर करावा.

3) मुलांनी कोणते ॲप किती वेळ वापरावे, हे पालकांनी ठरवावे.

4) मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळे व त्वचेचे कसे नुकसान होते, याची मुलांना जाणीव करून द्यावी.

5) तुमचं मूल जर मोबाईलमधील गेममध्ये जास्त गुंतत असेल तर त्याच्या मोबाईलच्या वापरावर हळूहळू बंदी घालावी.

पालकांनी अशी घ्यावी मुलांची काळजी

लहान मुलांच्या अंगात खूप एनर्जी आणि ताकद असते. त्याचा योग्यरितीने वापर केल्यास मुलं अभ्यासाव्यतिरिक्त इतर ॲक्टिव्हिटीजमधूनही जास्त शकतात. पण मुलांच्या हातात मोबाईल आल्यास त्यांचा सर्व वेळ त्यावर जातो आणि एनर्जीही त्यातच खर्च होते. त्यामुळे मुलांच्या हातात मोबाईल देण्यापेक्षा त्यांना इतर गोष्टींमध्ये व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हीही त्यांच्यासोबत वेळ घालवा. त्यांच्या मोबाईल वापरावर बंदी घालतानाच तुम्हीही त्यांच्यासमोर मोबाईलचा वापर टाळा. घरी मोबाईलचा कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत घालवा.