get rid of gas problem : आजकाल चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे आणि जंकफूडच्या अतिसेवनामुळे शरिराला आवश्यक पोषण मिळत नाही. जस्त प्रमाणात जंक फूड किंवा मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरिरातील हार्मोन्स असंतुलित होतात. शरिरातील हार्मोन्स असंतुलित झाल्यामुळे अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. जास्त प्रमाणात मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे अॅसिडिटी, पोटदुखी आणि गॅस सारख्या गंभीर समस्या उद्भवतात. अनेकदा रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात किंवा मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे गॅसचा त्रास होतो.
अनेकवेळा घरातील वयस्कर मंडळींना गॅसच्या किंवा पोटदुखीच्या समस्या होतात. परंतु गॅसची समस्या नेमकं कोणत्या कारणांमुळे होते? चला जाणून घेऊया. जेव्हा तुमच्या शरिरातील मोठ्या आतड्यांमध्ये सुक्ष्म जंतूंची संख्या वाढते त्यावेळी तुम्हाल गॅस, अपचन सारख्या समस्या होतात. जेव्हा तुमचे पोट साफ होत नही त्यावेळी देखील पोटदुखीची समस्या वाढते.
जेवणाची वेळ नियमित ठेवा
आजकालच्या धावपळीच्या जिवनशैलीमुळे जेवण करण्यास उशीर होतो. रात्री उशीरा जेवण केल्यामुळे अपचन आणि गॅस सारख्या समस्या होतात. गॅसच्या समस््या टाळण्यासाठी जेवणाची वेळ नियमित ठेवा. रात्रीच्या वेळा हरभऱ्याच्या डाळीचे पदार्थ, तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन करणं टाळा.
जास्तवेळ एका ठिकाणी बसू नये
आजकाल घरातून कामकरणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे एका ठिकाणी बसून काम करणे आणि जागेवरच बसून जेवणे यामुळे जास्त चालणं होत नाही आणि गॅस आणि अपचन यासारख्या समस्या होतात. त्यामुळे दर अर्घ्या तासाला चालणं गरजेचे आहे आणि जेवण केल्यानंतर १० ते १५ मिनिटे वॉक करा.
अनेकवेळा आवडता पदार्थ असल्यावर तो जास्त प्रमाणात खाल्ला जातो. जास्त प्रमाणामध्ये जेवन केल्यामुळे गॅसच्या समसस्या होतात. या समस्या होऊ नये म्हणून जेवणानंतर योग्य चुर्णांचे सेवन करावे. तसेच जेव्हा लहान बाळ दुध पितं त्यानंतर बाळांमध्ये गॅसच्या समस्या अधिक पहायला मिळतात. या गोष्टी टाळण्यासाठी बाळाला दुध पाजल्यानंतर गेच झोपून देऊ नये.