हिवाळ्यात अशा प्रकारे घ्या पाळीव प्राण्यांची काळजी, आरोग्याला होणार नाही नुकसान

| Updated on: Jan 03, 2025 | 5:37 PM

हिवाळ्यात पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण थंडीमुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे ते आजारी पडू शकतात. त्यामुळे हिवाळ्यात पाळीव प्राण्यांची योग्य काळजी घेण्यासाठी या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

हिवाळ्यात अशा प्रकारे घ्या पाळीव प्राण्यांची काळजी, आरोग्याला होणार नाही नुकसान
Follow us on

हिवाळा येताच खाण्यापिण्यापासून कपड्यांपर्यंत सर्व काही बदलण्याची गरज असते. थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी लोक सर्वतोपरी प्रयत्न करतात, पण त्याचबरोबर जनावरांनाही थंडीपासून वाचवणं गरजेचं आहे. आजच्या काळात प्रत्येकाच्या घरात कुत्रे किंवा मांजर असे पाळीव प्राणी असतात. घरात असलेल्या त्या प्राण्याची काळजी घेणे ही देखील आपली जबाबदारी आहे. कारण थंडीमुळे त्यांच्या शारीरिक स्थितीवर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

तुमच्या घरात कुत्रे किंवा मांजरीसारखे पाळीव प्राणी असतील तर या वेळी त्यांची काळजी घ्यावी. पण थंडीचा परिणाम त्यांच्या शरीरावरही पडतो. त्यामुळे हिवाळ्यात आपल्या जनावराची काळजी घेण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

जागेची काळजी घ्या

थंडीपासून बचाव करण्यासाठी पाळीव प्राण्यांसाठी उबदार आणि आरामदायक जागा निवडा. विशेषत: रात्री जेव्हा थंडी असते. त्यांना अशा ठिकाणी ठेवा जिथे ते थंडीपासून सुरक्षित राहतील. यासोबतच तुम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या जागेवर ब्लँकेट किंवा उबदार चादर ठेवू शकता.

हे सुद्धा वाचा

स्वेटर आणि जॅकेट

तुमच्या कडील कुत्रा आणि मांजर या पाळीव प्राण्यांना कपडे घालू शकता. या पाळीव प्राण्यांना स्वेटर आणि जॅकेटसारखे उबदार कपडे आपल्याला बाजारात किंवा ऑनलाइन सहज मिळतात. विशेषत: जेव्हा तुम्ही त्यांना बाहेर घेऊन जात तेव्हा त्यांना कपडे घाला. यामुळे त्यांच्या त्वचेचे आणि शरीराचे थंडीपासून बचाव होईल.

जमिनीवर झोपू देऊ नका

हिवाळ्यात आपल्या घराची फरशी थंड असते, म्हणून पाळीव प्राण्यांना थंड जमिनीवर झोपण्यापासून प्रतिबंधित करा, कारण यामुळे त्यांचे सांधे आणि हाडे खराब होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्यासाठी एक छोटा सा पलंग ठेवा किवा त्यांचा झोपण्याच्या ठिकणी चादर ब्लँकेट वेगळा ठेवा. त्यांचा पलंग नेहमी उंचीवर ठेवा जेणेकरून ते थंडीपासून वाचू शकतील.

मॉइश्चरायझिंग आणि साफसफाई

पाळीव प्राण्यांची त्वचा कोरडी होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही त्यांचे विशेष मॉइश्चरायझर वापरू शकता. तुम्हाला हे पाळीव प्राण्यांच्या पेट शॉप व स्टोअरमध्ये किंवा ऑनलाइन सहज सापडेल. त्याचबरोबर त्यांच्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. त्यांचे कपडे आणि पलंग स्वच्छ ठेवा. पाळीव प्राण्यांना हिवाळ्यात आंघोळीची फारशी गरज नसते, पण ते घाण झाले तर त्यांना अंघोळ घालावी लागते. तुम्ही 2 ते 3 दिवसांनंतर त्यांना अंघोळ घालण्याची वेळ सेट करू शकता. यासाठी जास्त गरम किंवा थंड पाण्याचा वापर करू नये.

पाळीव प्राण्यांना हिवाळ्यात पुरेसे पाणी पिण्यास प्रोत्साहित करा, कारण थंड हवामानात ते कमी पाणी पिऊ शकतात. तसेच बदलत्या ऋतूनुसार त्यांना खाऊ घालावे.