उन्हाळ्यात वजन लवकर कसे कमी करावे? तज्ञांकडून जाणून घ्या ‘या’ सोप्या टीप्स

| Updated on: Mar 24, 2025 | 6:26 PM

वजन कमी करणे सोपे काम नाही. काही लोकं यासाठी डाएटिंगसोबतच व्यायामही करतात. तथापि, हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात वजन कमी करणे सोपे असते. परंतु यासाठी योग्य पद्धतींचा समावेश करणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊयात...

उन्हाळ्यात वजन लवकर कसे कमी करावे? तज्ञांकडून जाणून घ्या या सोप्या टीप्स
weight-loss in summer holiday
Follow us on

आजच्या घडीला प्रत्येकजण वाढत्या वजनाच्या समस्येने त्रस्त झालेले आहेत. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी तसेच जीवनशैलीतील बिघाडांमुळे बहुतेक लोकांचे वजन वाढत चालेले आहेत. यामुळे याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. यासाठी चांगल्या आरोग्यासाठी व वजन कमी करण्यासाठी लोकं डाएटिंग आणि व्यायामाचे पालन करतात. एवढी मेहनत घेऊनही वजन लवकर कमी होत नाही त्यात वजन कमी करणे हे सोपे काम नाही. अशातच आता उन्हाळा आला आहे आणि अशा परिस्थितीत तज्ञांच्या या पद्धतींचा अवलंब केल्याने वजन कमी करणे थोडे सोपे होईल. चला तर मग जाणून घेऊयात तज्ञांच्या या सोप्या पद्धती कोणत्या आहेत.

हा तुमचा आहार असावा

उन्हाळ्यात जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळा. तसेच तज्ञांच्या सल्ल्यानुसार वजन कमी करताना जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेले पदार्थ खावेत. सहज पचणाऱ्या गोष्टी वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असतात. उन्हाळ्यात काकडी, टोमॅटो, खरबूज आणि टरबूज यांसारखे हायड्रेटिंग पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट करा.

ग्रीन टी प्या

ग्रीन टीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स वजन कमी करण्यास मदत करतात. चयापचय गतिमान करण्याव्यतिरिक्त ग्रीन टी शरीरातील अतिरिक्त फॅट बर्न करण्यास देखील मदत करते. दिवसातून दोन ते तीन कप ग्रीन टी पिण्याची सवय लावा, शक्यतो सकाळी प्यावा. ग्रीन टी व्यतिरिक्त, तुम्ही हर्बल टी देखील घेऊ शकता.

हे सुद्धा वाचा

फायबर आणि प्रोबायोटिक्स आवश्यक

उन्हाळ्यात फायबर आणि प्रोबायोटिक्सचा समावेश करा. तुम्ही दररोज दही, फळे, सॅलड आणि संपूर्ण धान्य यांचे सेवन करावे. फायबरमुळे पोट बराच काळ भरलेले राहते आणि जास्त खाणे टाळता येते. प्रोबायोटिक्स पचनसंस्था निरोगी ठेवतात आणि शरीरातील चयापचय वाढवतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

याशिवाय दररोज व्यायाम करण्याची सवय लावा. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम करू शकता. त्याचबरोबर दररोज किमान अर्धा तास चालत जा. यामुळे कॅलरीज बर्न होतात आणि स्नायू मजबूत होतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)