मुंबई : सध्याच्या काळात बहुतेक लोकांना डायबिटीसची समस्या असते. ताण तणाव, धावपळीचे जीवन, अनहेल्दी आहार अशा अनेक गोष्टींमुळे मधुमेहाची समस्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसते. तर डायबिटीसची समस्या झाल्यानंतर ती नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या शरीराची काळजी घेणे खूप गरजेचे असते. डायबिटीस झाल्यानंतर निष्काळजीपणा अजिबात करू नये. आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी व्यायाम करणं, योग्य आहार घेणं, वेळेत औषध घेणे खूप गरजेचे असते.
जर तुमची शुगर अचानक वाढली तर अशावेळी उच्च फायबरयुक्त अन्न खा. यामुळे तुमची साखर नियंत्रणात आणण्यास मदत होईल. तुमच्या रक्तातील साखरेचा संबंध हा बद्धकोष्ठतेशी असतो. जर तुमचे पोट नीट साफ होत नसेल तर तुमच्या रक्तातील साखर वाढू शकते, त्यामुळे अशावेळी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करणे खूप गरजेचे असते. फायबरयुक्त पदार्थ तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात तसेच तुमची शुगर नियंत्रणात आणण्यास मदत होते.
भरपूर पाणी प्या – जर तुम्हाला डायबिटीसचा त्रास असेल आणि शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात आणायची असेल तर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी तुमची शुगर नियंत्रणात आणण्यास मदत करते. पाणी हे इन्सुलिनच्या कार्याला प्रभावीपणे प्रोत्साहन देते. त्यामुळे पाणी पिल्यामुळे आपली अचानक वाढलेली शुगर अगदी कमी वेळात नियंत्रणात येण्यास मदत होते. त्यामुळे भरपूर पाणी आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते.
शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. व्यायाम हा आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतो. व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराची हालचाल होते आणि त्यामुळे आपल्या शरीराला उर्जा मिळते, स्नायू मजबूत होतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येण्यास मदत होते.