Diabetic Alert: मधुमेहामुळे दृष्टीवर होऊ शकतो परिणाम, अशी घ्या काळजी

| Updated on: Jan 09, 2023 | 1:06 PM

मधुमेहाची समस्या झपाट्याने वाढत आहे. मधुमेह हा आजार शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे होतो. अनेकदा मधुमेही रुग्णांना डोळ्यांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते.

Diabetic Alert: मधुमेहामुळे दृष्टीवर होऊ शकतो परिणाम, अशी घ्या काळजी
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – सध्याच्या काळात मधुमेहाची (diabetes) समस्या झपाट्याने वाढत आहे. शरीरातील रक्तातील साखरेचे (blood sugar) प्रमाण वाढल्यामुळे मधुमेह होतो. मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेची पातळी वेळोवेळी तपासत राहणे फार महत्वाचे असते. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना कमी दृष्टी, हृदयाशी संबंधित आजार आणि किडनीचे आजार अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत या आजारांपासून (disease) मुक्ती मिळवायची असेल तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवावी.

मधुमेहाचा त्रास असेल तर संबंधित व्यक्तीच्या डोळ्यांवर मोठा दुष्परिणाम होतो. अनेक वेळा रक्तातील साखरेची पातळी एवढी वाढते की त्या व्यक्तीला अंधत्वाचा सामना करावा लागू शकतो. मधुमेहामुळे, रेटिनोपॅथी, काचबिंदू आणि मोतीबिंदू अशा डोळ्यांशी संबंधित आजारांचा धोका लक्षणीय वाढतो. त्यामुळे तुम्हाला जर मधुमेह असेल तर डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.

डोळ्यांशी संबंधित कोणत्याही प्रकारचे आजार होऊ नये यासाठी या उपायांचा अवलंब करावा.

हे सुद्धा वाचा

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवावी

जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी म्हणजेच ब्लड शुगर जास्त असेल तर तुमच्या डोळ्यांच्या लेन्सचा आकार बदलू लागतो. ज्यामुळे तुम्हाला अस्पष्ट दिसू लागते. मात्र, ब्लड शुगरची पातळी नियंत्रित ठेवून या समस्येवर मात करता येते. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी जास्त असल्याने त्याचा तुमच्या डोळ्यांच्या रक्तपेशींवर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे वेळोवेळी ब्लड शुगरची पातळी तपासून तुम्ही ही समस्या टाळू शकता.

शरीराच्या इतर समस्यांकडे द्या लक्ष

हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल या अशा दोन गोष्टी आहेत, ज्यामुळे तुम्हाला दिसण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात ठेवणे महत्वाचे ठरते. हे नियंत्रणात ठेवणे केवळ तुमच्या डोळ्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर ठरते.

धूम्रपान बंद करा

धूम्रपान हे कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. तसेच मधुमेहाच्या रुग्णांसाठीही धूम्रपान करणे खूप धोकादायक आहे. धूम्रपानामुळे मधुमेही रुग्णांच्या नसा, पेशी आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. तसेच मधुमेाना धुम्रपान केल्यामुळे नीट न दिसण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागते.

रोज करा व्यायाम

रोज व्यायाम करणे हे आपल्या डोळ्यांसाठी चांगले असते. व्यायामामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासही मदत होते. अशा परिस्थितीत, तुम्ही दररोज 45 मिनिटे ते 1 तास व्यायाम करणे आवश्यक आहे. मात्र कोणताही नवीन व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

हेल्दी पदार्थ खा

पौष्टिक व आरोग्यदायी आहार खाणे हे आपल्या शरीरासाठी व दृष्टीसाठी उत्तम असते. अशा परिस्थितीत, मधुमेहाच्या रुग्णांनी संतुलित आहाराचे पालन करणे आणि शरीराला सर्व प्रकारची पोषक तत्वे प्रदान करणे महत्वाचे आहे.