मुंबई : सध्याच्या काळात लोक फास्टफूडवर मोठ्या प्रमाणात ताव मारताना दिसतात. त्यात सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू त्यामुळे गरमागरम भजी, वडापाव, पाणीपुरी अशा अनेक पदार्थांचा आस्वाद लोक घेतातच. तर फास्टफूड जास्त खाल्ल्यामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक लोकांना डबल हनुवटीची समस्या त्रास देते. मान आणि हनुवटीमध्ये चरबी जमा झाल्यामुळे डबल हनुवटीची समस्या उद्भवते. तर डबल हनुवटीची समस्या दूर करायची असेल तर आपण काही व्यायामांबाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे 15 दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.
1. जबड्याचा व्यायाम- जर तुम्हाला डबल हनुवटीची समस्या दूर करायची असेल तर त्यासाठी जबड्याचा व्यायाम करणं गरजेचं आहे. हा व्यायाम करण्यासाठी डोकं उजवीकडे वळवा आणि नंतर आपला खालचा जबडा पुढे सरकवत 5 ते 10 सेकंद त्या स्थितीत राहा. हा व्यायाम दिवसातून किमान 5 वेळा करत जा, ज्यामुळे तुम्हाला प्रभावी रिझल्ट मिळेल.
2. पाउट करा
तुम्ही सेल्फी किंवा फोटो काढताना पाउट करतच असाल. तर आता या पाउटचा उपयोग तुम्हाला डबल हनुवटी कमी करण्यासाठी उपयोग होणार आहे. जर तुम्ही डबल हनुवटीने त्रस्त असाल तर पाउट करा. दररोज चेहरा सरळ ठेवून 7 ते 8 सेकंद पाउट करा. हा पाउट तुम्ही दिवसातून 5 ते 10 वेळा केला पाहिजे जेणेकरून डबल हनुवटीचा त्रास कमी होईल.
3. जीभ स्ट्रेच करा
तुम्हाला डबल हनुवटी कमी करायची असेल तर जीभ स्ट्रेच कमी करण्याचा व्यायाम करा. यासाठी चेहरा सरळ ठेवा आणि जीभ बाहेर काढून ती नाकाकडे वाढवण्याचा प्रयत्न करा. यामुळे स्नायू ताणले जातील आणि चरबी कमी होण्यास मदत होईल.