Health : फक्त 15 मिनिटांमध्ये घालवा कायमसाठी चष्म्यापासून सुटकारा, जाणून घ्या!

| Updated on: Oct 05, 2023 | 9:18 PM

आता काळजी करण्याची गरज नाही कारण आता असे अनेक तंत्रज्ञान उपलब्ध आहेत ज्याच्या मदतीने तुमची चष्म्यापासून सुटका होण्यास मदत होईल. तर आता आपण या तंत्रज्ञानाबाबत जाणून घेणार आहोत.

Health : फक्त 15 मिनिटांमध्ये घालवा कायमसाठी चष्म्यापासून सुटकारा, जाणून घ्या!
Image Credit source: freepik
Follow us on

मुंबई : आजकाल वाढत्या स्क्रीन टाइममुळे बहुतेक लोकांना चष्मा लागलेला दिसतो. मोठ्यांना तर चष्मा लागलेला असतोच पण आता तर लहान मुलांना देखील चष्मा लागल्याचं पाहायला मिळतं. तसंच खराब दृष्टीमुळेही लोक चष्मा वापरतात. चष्मा वापरल्याने स्क्रीन समोर बसल्यानंतर डोळ्यांना त्रास होत नाही, लांबच्या गोष्टीही नीट दिसण्यास मदत होते. पण बहुतेक लोक दिवसभर चष्मा घातल्यामुळे कंटाळून जातात त्यामुळे त्यांना चष्म्यापासून सुटका हवी असते.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला चष्म्यापासून सुटका हवी असेल तर यासाठी तीन प्रकारची तंत्रे वापरली जातात. तर या तीनही शस्त्रक्रियांची प्रक्रिया आहेत ज्यामध्ये मशीनच्या सहाय्याने डोळ्याचा नंबर हटवला जातो. तर यातील पहिले तंत्र आहे Lenticule Based Procedure. यामध्ये क्लिअर, स्माईल अशी तंत्रे वापरली जातात. या तंत्रात लेझरच्या साह्याने लोकांच्या कॉर्नियावर लेंटिक्युल तयार करून ते बाहेर काढण्यास मदत होते. तर यातील दुसरं तंत्र आहे LASIK. या तंत्रामध्ये लेझर शस्त्रक्रियेद्वारे कॉर्निया पातळ केला जातो. Phakic IOL हे तिसरे तंत्र आहे. या तंत्रात चष्मा घालवण्यासाठी लोकांच्या डोळ्यात नैसर्गिक लेन्सवर एक लेन्स बसवली जाते.

लेझरच्या या तीनही शस्त्रक्रिया करण्यासाठी लोकांचे वय हे किमान 18 वर्षे असणे गरजेचे आहे. 18 वर्षांपेक्षा कमी असलेल्या लोकांना ही शस्त्रक्रिया करता येत नाही. कारण अठरा वर्षाखालील लोकांच्या चष्म्याची संख्या स्थिर नसते ती नेहमी बदलत राहते, त्यामुळे अठरा वर्ष पूर्ण असलेली लोकं ते 45 वर्षांपर्यंतच्या लोकांपर्यंत ही नेत्र शस्त्रक्रिया होऊ शकते.

कोणत्याही व्यक्तीच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याच्या डोळ्यांची तपासणी केली जाते. तपासणी करताना डोळ्यांचा कोरडेपणा, कॉर्नियाची जाडी, कॉर्नियाची ताकद, रेटिनाची चाचणी केली जाते. या तपासणीनंतर रुग्णाच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया होऊ शकते की नाही हे तपासले जाते. तसेच शस्त्रक्रियेसाठी कोणते तंत्र वापरणे गरजेचे आहे हे देखील तपासणीमध्ये समजते. या तपासणीनंतर लोकांच्या डोळ्याच्या स्थितीनुसार कोणते तंत्र वापरायचे हे ठरवले जाते. तर यशशस्त्रक्रियेच्या तीनही प्रक्रियेंना 10 ते 20 मिनिटे लागतात. तसेच हे तिन्ही तंत्र अत्यंत सुरक्षित आहेत