ही वस्तू जवळ ठेवा, उष्माघाताचा धोका टाळा, जीव वाचवणारी ही वस्तू घरात सहज उपलब्ध

| Updated on: Apr 17, 2023 | 7:11 PM

रविवारी जमलेल्या लाखो श्रीसेवकांच्या गर्दीमुळे उष्माघाताने 11 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर उन्हात थांबल्याने मुंबईतही लोकांचा मृत्यू होऊ शकतो याचा धक्कादायक अनुभव मिळाला आहे. ऊन्हाच्या तडाक्यापासून वाचण्याचा जालीम उपाय तुम्हाला सांगणार आहोत.

ही वस्तू जवळ ठेवा, उष्माघाताचा धोका टाळा, जीव वाचवणारी ही वस्तू घरात सहज उपलब्ध
HEAT WAVE
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : खारघरमध्ये उष्माघाताने अकरा जणांचा मृत्यू झाल्याने एरव्ही उत्तर भारतात होणारा प्रकार आपल्या मुंबईत कसा झाला ? याविषयी चर्चेला पेव फुटले आहे. सन स्ट्रोक,  हीट स्ट्रोक वा उष्माघात ज्याला म्हटले जाते ते आपण कडक ऊन असलेल्या प्रांताबाबत ऐकले होते. आपल्याला केवळ ऊन लागणे म्हणजे काय हेच माहीती होते. एरव्ही उत्तर भारतात ‘लू पडून’ इतके जण ठार झाले अशा बातम्याच आपण आतापर्यंत वाचल्या होत्या. परंतू रविवारी भर दुपारच्या ऊन्हाने उष्माघाताने नवीमुंबईतील 11 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. उन्हात बाहेर जास्त वेळ थांबणे किती जीवघातक ठरू शकते ? हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दुपारी उन्हात बाहेर पडताना काय काळजी घ्यावी ? याविषयी एक महत्वाचा घरगुती उपाया तुम्हाल सांगणार आहोत.

खारघर येथे आयोजित महाराष्ट्रभूषण या सरकारी कार्यक्रमात रविवारी जमलेल्या लाखो श्रीसेवकांच्या गर्दीमुळे उष्माघाताने अकरा जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर उन्हात थांबल्याने मुंबईतही लोकांचा मृत्यू होऊ शकतो याचा धक्कादायक अनुभव मिळाला आहे. उन्हाळ्यात तापमान चंद्रपूर, मराठवाडा अशा ठीकाणी 40 डीग्री सेल्सिअसच्याही पुढे गेलेले असते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना या तापमानाची आधीच शरीराला सवय असते.

अचानक अशा कडक उन्हात काही तास थांबलेल्या लोकांना उष्माघाताचा फटका बसु शकतो. आपल्या शरीराचे सामान्य तापमान 37 डीग्री सेल्सिअस असते. त्यापुढे तापमान गेल्यास आपल्या ताप आला असे आपण म्हणतो असतो. परंतू शरीराचे तापमान असेच वाढत गेल्यास आपल्या सन स्ट्रोक किंवा हीट स्ट्रोक बसु शकतो. आता आपण या प्रकरणात नेमकी उन्हात बाहेर पडताना नेमकी काय काळजी घ्यावी ते पाहूया…

onion

ही जालीम वस्तू जवळ बाळगा

घरातून बाहेर पडताना पांढरे किंवा सुतीकपडे घाला, तसे आपल्या खिशात साल काढलेला कांदा ठेवा, त्यामुळे उष्णतेचा आपल्याला काहीही त्रास होणार नाही. आपण दिवसभर जर कांदा खिशात ठेवला तर आपल्याला उन्हाच्या तिडीक कमी लागते. दिवसभर तुम्ही तुमचे काम करू शकता. जेव्हा तुम्ही संध्याकाळी हा कांदा पाहाल तर तो संपूर्ण सुकून गेलेला असतो. या मागे काय शास्रीय कारण आहे, हे माहीती नाही, परंतू यामुळे तुम्हाला आराम वाटेल. चक्कर आल्यावरही नाकाला कांदा लावतात. कांदा हा सर्व उष्णता शोषून घेत असल्याने ग्रामीण भागात कडक उन्हात जवळ कांदा बाळगतात.

1 ) उन्हाळ्यात पुरेसे पाणी प्यावे, ताक, लिंबू पाणी, नारळपाणी असे पेय पदार्थ जवळ ठेवा..
2 ) पांढरे सोम्य रांगाचे, सैलसर कपडे वापरा, डोक्यावर टोपी किंवा फडके बांधा..
3 ) आपली बाहेरील कामे स.10 च्या आत करा, किंवा संध्याकाळी करा.
4 ) चहा, कॉफी, दारू किंवा कार्बोनेटेड पेय टाळा
5 ) भरदुपारी गॅस किंवा चुलीसमोर स्वयंपाक करणे टाळा

उष्माघात म्हणजे काय ? त्याची काय कारणं आहेत ? काय काळजी घ्याल ?

भारत हा उष्ण कटीबंधातला देश आहे, आपल्या शरीराचे तापमान सर्वसाधारण 36 ते 37 डीग्री असते. वातावरणातले तापमान अनेक वेळा चाळीस अंशापेक्षा जास्त होते. कडक उन्हामुळे आपल्या शरीराचाही तापमान वाढते, शरीराचे तापमान वाढल्यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि शरीरातील पाणी कमी होते. यामुळे शरीराला घाम सुटतो त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन मेंदू, हृदय आणि शरीरामध्ये रक्तपुरवठा कमी होतो, यामुळे चक्कर येऊ शकते व्यक्ती बेशुद्ध पडू शकते. अशावेळी जर व्यक्तीला पाणी मिळाले नाही तर झटका येऊन ती व्यक्ती कोमामध्ये देखील जाऊ शकते, तसेच दगावू देखील शकते

काय काळजी घ्याल

उन्हाळ्यामध्ये बाहेर जाणे टाळा

बाहेर जाताना टोपी वा स्कार्फ बांधून जा

थोड सैल आणि सुती कपडे वापरा, शक्यतो पांढरा रंगाचे कपडे वापरा

सुती – मोकळ्या कपड्यांमुळे घामाचा त्रास होत नाही

तीन लिटर पेक्षा जास्त पाणी पिणे आवश्यक आहे

सुट्ट्या लागल्यामुळे जी मुले उन्हामध्ये खेळतात त्यांना जास्त त्रास होऊ शकतो

लक्षणे काय आहेत…

तोंड कोरडं पडतं

लघवी कमी होते शिवाय ती पिवळी होते.

चक्कर येते.