छोट्या गोष्टींवरून निगेटिव्ह विचार येत असतील तर या सात गोष्टी करा फॉलो, काहीच दिवसात दिसेल फरक!

| Updated on: Oct 26, 2023 | 12:21 PM

नकारात्मक विचार केल्यामुळे त्यांना अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. तर आता आपण काही अशा गोष्टींबाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमच्या मनातील निगेटिव्हिटी, डिप्रेशन, ताणतणाव या समस्या कमी होण्यास मदत होईल.

छोट्या गोष्टींवरून निगेटिव्ह विचार येत असतील तर या सात गोष्टी करा फॉलो, काहीच दिवसात दिसेल फरक!
Follow us on

मुंबई : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे बहुतेक लोक ताण तणाव, डिप्रेशन अशा गोष्टींचे शिकार होताना दिसतात. कामाचा ताण असो किंवा कोणतीही वैयक्तिक, कौटुंबिक कारणे असो अशा अनेक गोष्टींमुळे लोक डिप्रेशनला बळी पडताना दिसतात. तसेच  डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी काही लोक मेडिटेशन करताना दिसतात. पण मेडिटेशन करून देखील त्यांची डिप्रेशनची समस्या काही वेळा कमी होताना दिसत नाही. कारण काही लोक असे असतात जे नेहमी नकारात्मक विचार करत असतात.

तुलना करू नका – काही लोक असे असतात जे आपली तुलना समोरच्या व्यक्तीसोबत करत असतात. त्यामध्ये मग आपलं रिलेशन असेल किंवा आपली आर्थिक परिस्थिती असेल किंवा आपली वैयक्तिक वागणूक असेल अशा प्रत्येक गोष्टीत लोक समोरच्या व्यक्तीसोबत तुलना करत असतात, स्वतःला कमी लेखत असतात. तर अशा प्रकारची तुलना न करता प्रत्येकाने आपला भूतकाळ आणि आत्ताचा वर्तमान काळ यातील फरक पहावा. तरच तुमच्या आयुष्यात बदल घडण्यास मदत होईल आणि तुमच्या मनातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होईल.

वाईट गोष्टींचा विचार करू नका – नेहमी तुमच्या दिवसाची सुरुवात ही सकारात्मक विचाराने करा. कधीही झालेल्या किंवा होऊन गेलेल्या वाईट गोष्टींचा विचार पुन्हा पुन्हा करू नका. नवीन सकारात्मक गोष्टींचा विचार करा जेणेकरून तुम्हाला राग, ताणतणाव या गोष्टींचा सामना करावा लागणार नाही.

वेळ द्या – प्रत्येकावर जशी चांगली वेळ येते तशीच वाईट वेळ देखील येते. त्यामुळे वाईट वेळ आल्यानंतर खचून जाऊ नका स्वतःला थोडा वेळ द्या आणि मेहनत करत रहा. त्यामुळे तुमच्यावर चांगली वेळ नक्की येईल.

शांत रहा – बहुतेक लोक असे असतात ज्यांना त्यांचा राग कंट्रोल होत नाही. तर कधीही कोणत्याही गोष्टीचा राग आला तर रागात कोणताही निर्णय घेऊ नका. अशा वेळी शांत रहा. कारण राग आल्यानंतर तुमच्या मनात निगेटिव्हिटी येते त्यामुळे कधीही रागात शांत रहा.

हसत रहा – प्रत्येकाने नेहमी हसत राहिलं पाहिजे. हसल्यामुळे आपला ताणतणाव, स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. तसेच नेहमी हसत राहिल्यामुळे आपल्या मनातील नकारात्मकता कमी होते आणि आपल्या मनात सकारात्मक विचार निर्माण होतात. त्यामुळे नेहमी हसत राहिलं पाहिजे.

दुसर्‍यांचा विचार करू नका – काही लोक असे असतात जे दुसऱ्यांचा विचार खूप करतात. आपल्याबद्दल दुसरे काय विचार करतील किंवा आपल्याबद्दल ते काय बोलतील याचा भरपूर लोक विचार करत असतात. त्यामुळे कधीही दुसऱ्यांचा विचार करू नका स्वतःचा विचार करा आणि आयुष्यात पुढे जा.

दुसऱ्यावर निगडीत राहू नका – कधीही समोरच्यावर निगडित राहू नका. कारण बऱ्याचदा समोरच्याच्या वाईट मूडमुळे तुमचाही मूड खराब होऊ शकतो. त्यामुळे कधीही समोरच्यावर निगडित राहू नका स्वतःचा आयुष्य स्वतःच्या पद्धतीने आनंदाने जगा.