मुंबई : आपण कांदा चिरत असता डोळ्यात पाणी येतेच. त्यामुळे बहुतेक लोकांना कांदा चिरणे हे काम अवघड वाटते. तर डोळ्यात पाणी येते म्हणून काही लोक कांदा चिरायचं टाळतात. तर आता आपण काही अशा गोष्टींबाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे कांदा चिरत असताना आपल्या डोळ्यात पाणी येणार नाही.
1. सगळ्यात आधी कांदा नीट सोलून घ्या. त्यानंतर कांद्याचे दोन तुकडे करा. हे तुकडे 15 ते 20 मिनिटे पाण्यात टाकून ठेवा. तुमच्याकडे जर व्हिनेगर असेल तर त्या पाण्यात तुम्ही ते टाकू शकता. यामुळे कांद्यातील एन्झाइम्स बाहेर पडते आणि तो चिरताना डोळ्यात पाणीही येत नाही.
2. कांदा चिरत असताना तो धारदार चाकूने चिरा. कारण धारदार चाकूने कांदा चिरला की कांद्याचा थर कापला जातो. तसंच यामुळे कांद्यातील एन्झाइम्स बाहेर पडते. त्यामुळे कांदा चिरताना डोळ्यात पाणी यायचं थांबतं.
3. जर कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर, कांदा चिरण्यापूर्वी तो 20 ते 25 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे कांद्यातील एन्झाइम्सचा प्रभाव कमी होतो आणि यानंतर कांदा चिरल्यानंतर डोळ्यांना त्रासही होत नाही.
4. कांदा चिरत असताना तुम्ही गॉगलचा देखील वापर करू शकता. पण हा असा गॉगल असतो जो डोळ्यांपर्यंत हवा येऊ देत नाही. त्यामुळे कांदा चिरताना अशा प्रकारचा गॉगल वापरल्यास तुमच्या डोळ्यात पाणी येणार नाही.
5. तसंच कांदा कापण्याअगोदर आपण त्याची सालं काढून टाकतो. तर या काढलेल्या सालांपैकी एक किंवा दोन सालं घ्या आणि ती कांदा कापताना तुमच्या डोक्यावर ठेवा. यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी यायचं थांबेल.