पृथ्वीतलावरून पुरुष होणार नाहीसे, कारण…! शास्त्रज्ञांनी केला धक्कादायक दावा
शास्त्रज्ञांच्या धक्कादायक माहितीनंतर पुरुषांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. येत्या काही वर्षात वाय गुणसूत्र नाहीसं होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
1 / 5
पृथ्वीतलावरून पुरुषांची जात नष्ट होईल, असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. पण शास्त्रज्ञांनी दावा करत धक्कादायक माहिती समोर आणली आहे. येत्या काही वर्षात पुरुषांमधील वाय गुणसूत्र नष्ट होतील. त्यामुळे पृथ्वीतलावरून पुरुषच नाहीसे होतील. (फोटो - Pixabay)
2 / 5
शास्त्रज्ञांनी नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या ओशिमा या जापानी बेटावरी काटेरी उंदरांवर हा प्रयोग केला. या उंदरांची आणि मानवी शरीर रचना सारखीच आहे. एक्स आणि वाय गुणसूत्र दोघांमध्ये आढळतात. उंदरामध्ये दिसणारी लक्षणं जवळपास पुरुषांमध्ये दिसत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. (फोटो - Pixabay)
3 / 5
होक्काइडो युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक असातो कुरोइवा यांनी सांगितलं की, सस्तन प्राण्यांमध्ये वाय गुणसूत्र झपाट्याने कमी होत आहेत. त्यामुळे पुरुष जात नष्ट होण्याची शक्यता वाढली आहे. (फोटो - Pixabay)
4 / 5
मानवी शरीरातील गुणसूत्र मुलगा की मुलगी ठरवतात. म्हणजेच X आणि Y गुणसूत्रावरून गर्भाशयातील मूल मुलगा की मुलगी हे ठरतं. (फोटो - Pixabay)
5 / 5
मेलबर्नच्या ला ट्रोब विद्यापीठाचे प्रा. ग्रेव्ही यांनी हे संशोधन धक्कादायक असल्याचे सांगितलं आहे. काटेरी उंदीर आणि मानव यांच्या संरचनेत कोणताही फरक नसल्यामुळे याबाबतची शक्यता वाढली आहे. (फोटो - Pixabay)