मुंबई : खासगी क्षेत्रातील (private sector) आघाडीच्या सर्वसाधारण विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड यांनी आपल्या आरोग्य विमा पॉलिसीधारकांसाठी (Health Insurance Policy) एनीव्हेअर कॅशलेस या अनोख्या सुविधेची घोषणा केली आहे. आरोग्य विमा क्षेत्रातील ही अशी पहिल्या स्वरुपाची सुविधा आहे. एखादे रुग्णालय जरी आयसीआयसीआय (ICICI) लोम्बार्डच्या सध्याच्या हॉस्पीटलच्या शृंखलेत समाविष्ट नसले तरी या सुविधेआधारे विमाधारकांना कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस सुविधेचा लाभ घेता येईल. ग्राहकांना त्यांच्या खिशातून कोणताही नवा पैसा त्यासाठी खर्च करावा लागणार नाही.
एनीव्हेअर कॅशलेस सुविधा ही संबंधित रुग्णालयाच्या कॅशलेस सुविधेच्या मान्यतेच्या अधीन आहे. या सुविधेचा लाभ मिळण्यासाठी विमाधारकाला रुग्णायात भरती होण्यासाठी कंपनीला 24 तास आधी सुचित करावे लागणार आहे. ते रुग्ण, पॉलिसीची माहिती, हॉस्पीटलचे नाव, उपचार, उपचार करणारे डॉक्टर इत्यादींबद्दल मूलभूत माहिती विमा कंपनीला कळवू शकतात. ही नवी सुविधा आयएल टेक केअर अॅपच्या सर्व्हिस वुई ऑफर या विभागातून सुध्दा विमाधारक प्राप्त करु शकतात. ही नवी सुविधा सुरवातीला प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली होती, परंतु आता भारतभर आयएल टेक केअर अॅपच्या माध्यमातून उपलब्ध आहे.
ग्राहकांच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास सध्याच्या स्थितीत रुग्णालयात सुरुवातीला भरावे लागणारे डिपॉझिट, सर्व खर्चाची रक्कम अदा करणे, बिलांच्या मूळ पावत्या जमा करणे आणि अगदी बारीकसारीक बाबी समजून घेण्यासाठी विमा कंपनीबरोबर समन्वय साधणे आदी कटकटीतून एनीव्हेअर कॅशेलेस सुविधेमुळे ग्राहकांची मुक्तता झाली आहे. रुग्णालयात भरती ते डिस्चार्ज या प्रवासातील सर्व सोपास्कारांचा विमाधारकाला विनाअडचणी आणि सहजसोपा अनुभव ही नवीन सुविधा प्रदान करते. तसेच विमाधारकाला नजीकचे किवा शिफारस करण्यात आलेले रुग्णालय निवडण्याची संधी ही नवीन सुविधा देते आणि त्यामुळे उपचाराच्यावेळी विम्याबाबतच्या बारीकसारीक बाबींवर वेळ खर्च करण्याऐवजी आपल्या कुटूंबाच्या स्वास्थाकडे लक्ष केंद्रीत करण्यास वाव देते.
नवीन सुविधेचा लाभ मिळविण्यासाठी ग्राहक आमच्याशी अशा माध्यमातून पोहचू शकतात -) आयएल टेक केअर अॅप -) आएलटीसी अॅप होम पेज -) सर्व्हीस वुई ऑफर -) हेल्थ असिस्टंट -) एनीव्हेअर कॅशलेस
नवीन सुविधेबद्दल बोलताना आयसीआयसीआय लोम्बार्डचे कार्यकारी संचालक अलोक अगरवाल म्हणाले की, एनीव्हेअर कॅशलेस सुविधा ही भारतातील आरोग्य विमा क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे पाऊल आहे आणि प्रत्येकाला उत्तम आरोग्य सुविधेचा लाभ प्रदान करते. उपचाराच्यावेळी संबंधित व्यक्तीला भावनिकदृष्ट्या जाव्या लागणाऱ्या तणावाच्या स्थितीची ही सुविधा दखल घेते आणि आमच्या विमाधारकाला अधिकाधिक आराम देत त्याच्या या प्रवासातील अडचणी दूर करण्याचे उद्दीष्ट ठेवते. त्याच्या आरोग्यविषयक गरजा उत्तमरित्या पूर्ण करत आमची ही सुविधा विमाधारकाला हमीची एक खात्री देते. नाविन्यता आणि ग्राहककेंद्रीत धोरणाप्रति कंपनीची वचनबध्दता या उदाहरणातून दिसून येते. यातूनच आम्ही आगळेवेगळे ठरतो आणि विमा क्षेत्रात आयसीआयसीआय लोम्बार्डला एक विश्वासू साथीदार म्हणून नावारुपास आणले आहे.
आमची साखळी अधिकाधिक विस्तारत टियर टू आणि थ्री शहरात विम्याचे कवच अधिकाधिक फैलावण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. ग्राहकांच्या गरजांचा प्राधान्यक्रम निश्चित करणे आणि जरी आरोग्याची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असले तरी ग्राहकांना चांगले पर्याय देत आणि त्यांचा सक्रीय सहभाग वाढवत आयसीआयसीआय लोम्बार्डला त्यांचे उद्दीष्ट साध्य करायचे आहे. नवीन सुविधेमुळे विमा दाव्याची प्रक्रिया अडचणमुक्त करत आपल्या ग्राहकांना सुरक्षा आणि सहजतेची भावना कंपनीला रुजवायची आहे.
याआधी कंपनीने अनेक सुविधा अंमलात आणल्या आहेत. त्यात कृत्रिम बुध्दीमत्तेवर आधारित कॅशलेस क्लेम मंजुरी पध्दत आणि होम हेल्थकेअर आदी सुविधांचा समावेश आहे. कंपनीने मोटार ओडी पॉलिसी सुरु केली आहे, त्यात वाहन चालविण्याच्या सवयीचे सतत निरीक्षण करण्यासाठी टेलेमॅटीक्स तंत्रज्ञानाचा वापर करत सुरक्षित वाहन चालविल्याच्या सवयीबद्दल बक्षीस दिले जाते. ग्राहकांना 24 बाय 7 सतत सहाय्य, सहजरित्या वापरता येणारे मोबाईल अॅप आणि सुटसुटीत क्लेम प्रक्रिया यातून आयसीआयसीआय लोम्बार्डचा ग्राहककेंद्रीत दृष्टीकोन प्रकट होतो.