आपले चांगले आरोग्य ही दीर्घायुष्य जगण्याची गुरुकिल्ली आहे, जी टिकवून ठेवणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. सध्याच्या काळात दीर्घायुष्याची कल्पना सर्वांना खरी वाटणार नाही, पण तसे करणे शक्य आहे. जीवनशैलीत (Changes in lifestyle) छोटे-छोटे बदल केल्यास आपण तसे करण्यास सक्षम ठरतो. या छोट्या बदलांमध्ये खाण्या-पिण्याच्या सवयीही जोडलेल्या आहेत. सर्वांनाच माहीत आहे, की सुका मेवा हा आपल्या शररातील पोषक तत्वांची पूर्तता करण्यासाठी गरजेचा आहे आणि त्याच्या सेवनाने अनेक आजारही दूर राखण्यात यशस्वी ठरतो. यामध्ये सर्वांनाचा खायला आवडतात ते म्हणजे बदाम. बदाम (Almonds) हे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असून लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण त्याचे सेवन करू शकततात. बदामात मुबलक प्रमाणात पोषक तत्वं आणि अँटी-ऑक्सिडेंट्स (Anti oxidants) असतात, जे आपल्या शरीराच्या अनेक समस्या दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
व्हिटॅमिन बी2 (रायबोफ्लेविन) , फॉस्फरस आणि कॉपरचा मोठ्या प्रमाणात स्त्रोत बदामात असतो, त्याचे नियमित सेवन केल्याने आपल्याला निरोगी जीवन मिळू शकते. रोज एक मूठभर बदाम खाल्यामुळे हृदयाच्या समस्या, जाडेपणा आणि मेंदूच्या समस्या दूर होऊ शकतात. एक मूठ बदामामध्ये (अंदाजे 28 ग्रॅम) 3.5 ग्रॅम फायबर, 6 ग्रॅम प्रोटीन आणि 14 ग्रॅम फॅट असते. तसेच त्यामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नशिअम आणि मँगेनीज हे मुबलक प्रमाणात असतात.
शरीरासाठी आवश्यक असणारी अनेक प्रथिने, फॅट, जीवनसत्वे आणि मिनरल्स यांची पूर्तता करणाऱ्या बदामाचे सेवन बहुतांश लोक करतात. विशेषत: थंडीत बदाम खाण्यास बरेच लोक पसंती देतात. मात्र बदाम भिजवून खावेत की नुसतेच, कोरडे खावेत, याबाबत लोकांच्या मनात संभ्रम असतो. नुसते बदाम खाण्यापेक्षा ते रात्री भिजवून ठेवून सकाळी खाणे जास्त फायदेशीर असते. भिजलेल्या बदामांमध्ये पौष्टिक तत्व वाढतात, ज्यामुळे ते आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. खरंतर बदामाच्या सालांमध्ये टॅनिन नावाचे तत्व आणि खास ॲसिड्स असतात, जे बदामातील पोषक तत्वं शरीरात शोषू देत नाहीत. त्यामुळे बदाम भिजवून त्यांची सालं काढून खाल्याने बदामातील पोषक तत्वं संपूर्ण प्रमाणात शरीराला मिळतात व नीट शोषली जातात.
हाय फायबर, प्रोटीन्स, व्हिटॅमिन ई, सेलेनियम, जस्त, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि बी व्हिटॅमिनसारख्या अनेक तत्वांनी भरपूर असलेले बदामाचे सूप पिणेही शरीरासाठी फायदेशीर असते. वाढत्या वयातील मुलांसाठी बदामाचे सूप खूप लाभदायक असते. मुलांना जर सूप आवडत नसेल तर त्यांना बदाम भिजवून किंवा भाजून खायला देता येऊ शकतात.
खरंतर बदाम खाणं सर्वांनाच आवडतं मात्र काही लोकांना बदाम खाल्याने ॲलर्जी होते. त्यामुळे बदाम कोणी खावे व कोणी खाऊ नयेत, असा प्रश्न उपस्थित होतो.
शरीरात हे 4 त्रास होत असतील बदाम खाऊ नयेत :